दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या निवृत्तीचे सत्र सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत असलेला फलंदाज थ्यूनिस डी ब्रुइन याने गुरुवारी (16 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेरच्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
Theunis de Bruyn has announced his retirement from international cricket!
"It is time I say goodbye to international cricket and focus on the next chapter" – he is quoted as saying#SAvWI #cricket pic.twitter.com/g1mqtoPk9C
— ThePoppingCrease (@PoppingCreaseSA) February 16, 2023
डी ब्रुइन याने 2017 मध्ये टी20 पदार्पण केले होते. तो दोन टी20 सामन्यात केवळ 26 धावा काढल्या होत्या. याव्यतिरिक्त तो दक्षिण आफ्रिकेसाठी 13 कसोटी सामने खेळला. यामध्ये त्यांनी एका शतकासह 468 धावा केल्या होत्या.
त्याचा देशांतर्गत संघ असलेल्या टायटन्सने अधिकृतरित्या निवेदन जाहीर करत त्याच्या निवृत्तीची बातमी दिली. त्यांनी लिहिले,
‘मी नशीबवान आहे की क्रिकेटच्या सर्वोच्च स्थान नेहमी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो. हा गौरवशाली क्षण होता. माझे स्वप्न होते की मी ज्या लोकांना माझे आयडल म्हणत होतो त्या लोकांसह मला ड्रेसिंग रूममध्ये राहायला मिळाले. मी आतापर्यंत जे काही साध्य केले त्यानंतर ही थांबण्याची योग्य वेळ असल्याचे मला वाटते. आता आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू करायची वेळ आली आहे. मी भविष्यासाठी उत्साहीत असून, उरलेल्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.’
डी ब्रुइन याने नुकत्याच समाप्त झालेल्या एसए टी20 लीगमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने या स्पर्धेत संघासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक 238 धावा केल्या होत्या. संघाचा नियमित कर्णधार वेन पार्नेल दुखापतग्रस्त झाल्याने त्याने अखेरच्या चार साखळी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व देखील केले होते. मात्र, अंतिम सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने कॅपिटल्स संघाला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केलेले.
(South Africa Batter Theunis De Bruyn Retired From International Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत डेविड वॉर्नर खेळणार की नाही? कर्णधार पॅट कमिन्सने दिले उत्तर
दिल्लीत बदलले टीम इंडियाचे हॉटेल! ‘या’ कारणाने बोर्डाला घ्यावा लागला निर्णय