---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 6, 2026 6:08 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 चा रणसंग्राम 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे (ICC T20 international world cup 2026). सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया आपल्याच मायदेशात वर्ल्ड कपचं जेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, यंदाच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-वोल्टेज सामना चाहत्यांना पाहायला मिळणार नाही.

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विश्वचषकासाठी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या तीन माजी खेळाडूंचाही या पॅनेलमध्ये समावेश आहे.

स्पर्धेमध्ये रंजक आणण्यासाठी नासिर हुसैन, रवी शास्त्री, इयान बिशप आणि इयान स्मिथ कॉमेंट्री करताना दिसतील. त्यांच्यासोबत सुनील गावस्कर, दिनेश कार्तिक, कुमार संगकारा, सॅम्युअल बद्री, रॉबिन उथप्पा, कार्लोस ब्रेथवेट, मॅथ्यू हेडन, डेल स्टेन आणि मायकेल एथर्टन यांसारखे स्टार खेळाडू समालोचन करतील.

जरी पाकिस्तान संघ भारताविरुद्ध खेळणार नसला, तरी वसीम अक्रम, वकार युनूस आणि रमीज राजा हे तीन पाकिस्तानी दिग्गज कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. याशिवाय हर्षा भोगले, डॅनी मॉरिसन आणि सायमन डॉल यांचाही ब्रॉडकास्टर पॅनेलमध्ये समावेश आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी तीन सामने खेळवले जातील:
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स
वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड
भारत विरुद्ध अमेरिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---