आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघाने अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून दमदार सुरुवात केली आहे. आता भारतीय संघ 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun jetli Stadium) नामीबियाविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघातून 5 महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah & Washington Sundar) आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिटनेसचाही समावेश आहे.
नामीबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर फिट होण्याची शक्यता आहे. कर्णधार सूर्याने माहिती दिली की, सुंदर दिल्लीत संघात सामील होईल. तसेच तापामुळे बुमराह गेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता नामीबियाविरुद्धच्या सामन्यासाठी तो पूर्णपणे फिट झाला आहे. आजारपणामुळे अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) गेल्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी येऊ शकला नव्हता. रिपोर्टनुसार, तो पुढच्या सामन्यापूर्वी पूर्णपणे बरा होईल.
अमेरिकेवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुढचा सामना दिल्लीत असल्याने भारतीय खेळाडू घरच्या मैदानावर जोरदार सराव करणार आहेत.






