---Advertisement---

बीसीसीआयचे नवीन वार्षिक करार जाहीर! रोहित-विराटला धक्का, तर शुबमन गिलची ‘ग्रेड A’ मध्ये एन्ट्री

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 9:26 PM
---Advertisement---

बीसीसीआयने (BCCI ) खेळाडूंच्या नवीन वार्षिक करारांची घोषणा केली आहे. यात अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर काही दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ‘ग्रेड A’ मध्ये स्थान देण्यात आले आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली आता फक्त एकदिवसीय (ODI) सामने खेळत असल्यामुळे त्यांना ‘ग्रेड A’ मधून बाहेर करून ‘ग्रेड B’ मध्ये टाकण्यात आले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टीरक्षक इशान किशन यांना या नवीन करारात स्थान मिळालेले नाही. पुरुष गटात एकूण 30 खेळाडूंना तर महिला गटात 21 खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे.

ग्रेड A : शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा

ग्रेड B : रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर

ग्रेड C : अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवी बिश्नोई, ऋतुराज गायकवाड

महिलांच्या ‘ग्रेड A’ मध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या चौघींना स्थान मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---