भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामना दिल्ली येथे खेळला जाणार आहे. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) अरूण जेटली स्टेडियम येथे हा सामना सुरू होईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे पत्रकारांना सामोरे गेले. या पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड यांचा मजेदार अंदाज पाहायला मिळाला.
नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूं पुढे अक्षरशः नांग्या टाकल्या. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 तर दुसरा डाव अवघ्या 91 धावांवर गुंडाळला. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही अशीच खेळपट्टी मिळण्याची शक्यता आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत द्रविड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका पत्रकाराने भारतीय संघातील डावखुऱ्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना द्रविड म्हणाले,
“डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज नेहमीच गोलंदाजी आक्रमणात विविधता घेऊन येतो. आपल्याकडे जहीर खान असा गोलंदाज होता. आत्तादेखील अर्शदीप सिंग हा तयार होतोय. वनडे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने रणजीत देखील एक दोन सामने गाजवले. मात्र, त्याला आणखी थोडी मेहनत करावी लागेल.”
याच पत्रकाराने मिचेल स्टार्क व शाहीन शाह आफ्रिदी यांच्यासारखे गोलंदाज भारताकडे नाहीत असा सवाल उपस्थित केला. त्याला उत्तर देताना द्रविड मिश्किलपणे म्हणाले,
“आपल्याकडे असे गोलंदाज मिळतात का? तुमच्याकडे असे 6 फूट 5 इंच उंचीचे डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज असतील तर आणून द्या. कोणत्याही गोलंदाजाकडे उंची आणि टिकला आहे म्हणून संघात स्थान देता येत नाही. यासाठी नक्कीच कामगिरी करून दाखवावी लागते.”
सध्या भारतीय संघात मोहम्मद सेमी व मोहम्मद सिराज हे कसोटी संघात धुरा वाहताना दिसतात.
(Rahul Dravid Funny Reply In Press Conference Before Delhi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत डेविड वॉर्नर खेळणार की नाही? कर्णधार पॅट कमिन्सने दिले उत्तर
दिल्लीत बदलले टीम इंडियाचे हॉटेल! ‘या’ कारणाने बोर्डाला घ्यावा लागला निर्णय