---Advertisement---

अर्रर्र! सूर्यादादा गोलंदाजीत ठरला फूस्स, स्वत:च्याच बॉलिंगवर वैतागला; पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, ऑगस्ट 29, 2024 10:23 PM
surya bowling
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज व टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहे. सूर्या तमिळनाडूच्या प्रतिष्ठित बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत मुंबईसाठी खेळत आहे. टीएनसीए इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात तो फलंदाजी व्यतिरिक्त गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करताना दिसला. सर्फराज खान याच्या नेतृत्वात खेळताना त्याने आधी फलंदाजीत आक्रमक 30 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना मात्र एका षटकात धावा केल्या.

सूर्यकुमार या सामन्यात गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध चौकार मारल्यानंतर तो काहीसा संतापलेला दिसला. सूर्याच्या गोलंदाजीवर आतिश याने फुलटॉस चेंडू मिळाल्यावर चौकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर देखील त्याने चौकार मारला. या षटकात दहा धावा निघाल्या. यानंतर त्याने पुढे एकही षटक टाकले नाही.

टीएनसीए इलेव्हन आणि मुंबईच्या दरम्यानच्या सामन्यामध्ये टीएनसीएने प्रथम फलंदाजी करताना 379 धावा केल्या. या धावांचे प्रत्युत्तर देताना मुंबईचा संघ केव्हा 156 धावा बनवू शकला. टीएनसीए इलेव्हन संघाने दुसऱ्या डावा 286 धावा केल्या. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी 510 धावांचे आव्हान आहे. हे आव्हान काहीसे अवघड दिसतेय.

सूर्यकुमार या स्पर्धेनंतर दुलिप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो दुलिप ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील टीम सी मध्ये खेळेल. यानंतर होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सूर्यकुमार याला संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. यापूर्वी सूर्यकुमार याने भारतासाठी केवळ एक कसोटी सामना खेळला आहे.

सूर्यकुमार हा सध्या भारताच्या टी20 संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेत मालिका जिंकली. आगामी काळात त्याच्याकडे आपल्या नेतृत्वात भारताला 2026 टी20 विश्वचषक जिंकण्याची संधी असेल. गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली तो किमान दोन वर्ष भारतीय संघाचा कर्णधार असू शकतो.

हेही वाचा – 

शतक झळकावत जो रुटने केली ॲलिस्टर कुकची बरोबरी, आता गावसकरांच्या विक्रमावर नजर

रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार? MI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---