मागील हंगामात कर्णधारपदावरुन काढून टाकल्यानंतर रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो, अशा चर्चा सुरू आहेत. कर्णधारपावरुन हकालपट्टी केल्यानंतर रोहित मुंबई संघातून बाहेर पडू शकतो आणि आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात उतरू शकतो. यादरम्यान पंजाब किंग्ज फ्रँचायझीही त्याला विकत घेण्यासाठी तयारी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र आता मुंबई संघ त्यांच्या जुन्या कर्णधाराला टीममध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे.
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की अशा काही बातम्या समोर आल्या आहेत, ज्यानुसार मुंबई इंडियन्स पुढील हंगामासाठी रोहित शर्माला कायम ठेवणार आहे. ‘हिटमॅन’ रोहितला जे हवे आहे ते सर्वकाही देण्यास मुंबईचे व्यवस्थापन तयार आहे, असेही सांगण्यात येत आहे. मात्र मुंबईने रोहितला संघात कायम ठेवले त्याला पुन्हा कर्णधार बनवायचे की नाही? याचा निर्णय होणे बाकी आहे. असे असले तरीही आतापर्यंत मुंबई इंडियन्स किंवा स्वतः रोहित शर्माकडून असे कोणतेही विधान आलेले नाही.
गेल्या वर्षी कर्णधारपद हिरावून घेतले
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. मुंबईने हार्दिकला गुजरात टायटन्समधून ट्रेड केले होते. हंगामादरम्यान, रोहितचे मुंबईचे व्यवस्थापन आणि हार्दिक पांड्या यांच्याशी संबंध बिघडल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्याच वेळी, हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला होता.
रोहितबाबत अश्विननेही मोठे वक्तव्य केले आहे
रोहित शर्माने मुंबई इंडियन्समध्ये राहावे की संघ सोडावा? यावर रविचंद्रन अश्विनने नुकतेच मोठे वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, मोठ्या खेळाडूंच्या कारकिर्दीत असा टप्पा येतो जेव्हा त्यांना पैशाचा फारसा फरक पडत नाही. त्यांना फक्त चांगल्या वातावरणात क्रिकेट खेळायचे असते. आता नेमकं काय घडतं?, हे येत्या लिलावातच समजेल.
हेही वाचा –
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये