भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामना दिल्ली येथे खेळला जाणार आहे. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) अरूण जेटली स्टेडियम येथे हा सामना सुरू होईल. हा सामना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. कारण, हा त्याचा शंभरावा कसोटी सामना असेल. या शंभराव्या सामन्याआधी त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली येथील सामन्यात उतरताच पुजारा भारतासाठी शंभर कसोटी सामने खेळणारा तेरावा कसोटीपटू ठरेल. आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत तो भारताचा एक प्रमुख फलंदाज म्हणून समोर आला. या मोठ्या कारकिर्दीत तो शुक्रवारी मैलाचा दगड पार करेल. तत्पूर्वी बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“मी क्रिकेट खेळावे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. त्यांचा या संपूर्ण प्रवासात मोठा पाठिंबा राहिला आहे. मला शंभराव्या सामन्यात खेळताना पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. ते मैदानात उपस्थित असतीलच. मात्र, मला इतक्यातच समाधानी व्हायचे नाही. माझे स्वप्न आहे की, मी भारतासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकावी.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रासाठी शानदार कामगिरी केल्यानंतर 2010 मध्ये त्याला भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतीय दिग्गज राहुल द्रविड याच्या निवृत्तीनंतर तो भारतीय संघाची नवी भिंत म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 99 कसोटी सामन्यांत 44.16 च्या शानदार सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 शतकांचा समावेश आहे. भारतीय संघाने 2017 व 2021 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळवलेल्या दोन्ही कसोटी मालिका विजयांमध्ये त्याची भूमिका निर्णायक राहिली होती.
(Cheteshwar Pujara Said Wining World Test Championship In My Dream Before His 100th Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही 6 फुट 5 इंच उंचीचा गोलंदाज घेऊन या’, राहुल द्रविड यांची चक्क पत्रकाराकडे मागणी
BREAKING: अवघ्या 30 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच गाजवलेली एसए टी20 लीग