भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे खेळला जाईल. अरुण जेटली स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न असेल. नागपूर येथील पहिल्या कसोटीत पराभूत व्हावे लागल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघ या कसोटीसाठी आपल्या संघात बदल करताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने याबाबतचे सूचक वक्तव्य केले आहे.
चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले होते. यजमान संघाने अवघ्या तीन दिवसात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूं पुढे नांग्या टाकल्याने त्यांना हा पराभव पत्करावा लागला. दिल्ली कसोटीआधी बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने संघात बदल होण्याची हिंट दिली. त्याने मधल्या फळीतील फलंदाज ट्रेविस हेडबद्दल बोलताना म्हटले,
“हेड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याची मागील वर्षातील कामगिरी उत्कृष्ट होती. त्याचा संघात समावेश करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे ”
हेड सध्या जागतिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. नागपूर कसोटीत त्याला वगळून मॅट रेनशॉ याला संधी दिल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कमिन्स याने अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर याच्या विषयी देखील आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,
“वॉर्नरची भारतातील फॅन फॉलाईंग मोठी आहे. ज्यावेळी तो त्याच्या फॉर्ममध्ये येतो तेव्हा तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. आम्ही या खेळपट्टीबद्दल फारसे काही बोलू इच्छित नाही. मात्र, येथे देखील चेंडू वळण घेताना नक्कीच दिसेल.”
दिल्ली कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ-
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लायन व जोस हेजलवूड.
(Pat Cummins Hint Travis Head Play Delhi Test Renshaw Out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
पहिल्या आयपीएल विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील