आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आज (७ फेब्रुवारी) पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात सुरू आहे. कोलंबोमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंड्सने फलंदाजीला उत्तम सुरूवात करत पाकिस्तानचा निर्णय चुकला की असे वाट होते. तेवढ्यात सीमारेषेवर बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीने मिळून जबरदस्त कामगिरी करत झेल पकडला. त्यांच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तान संघ नेहमी त्यांच्या ढीसाळ क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत असतो, मात्र टी२० विश्वचषकात त्यांनी चांगली सुरूवात केली आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीने मोहम्मद नवाजच्या षटकात ही कामगिरी केली. सामन्याच्या ५व्या षटकात नवाजने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर नेदरलॅंड्स मायकल लेविटने मारलेला शॉट सीमारेषेवर गेला. तेथे उभ्या असलेल्या बाबरने तो दोन हातांनी पकडत सीमरेषा पार करणार तोच हवेत उडवला आणि शाहीनने तो झेलला. या झेलला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
मायकल चांगल्या लयीत दिसत होता. त्यामुळे त्याची विकेट पाकिस्तानसाठी महत्वाची ठरली आहे. तो १५ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकार मारत २४ धावा करत बाद झाला.
या सामन्यात नेदरलॅंड्सचा डाव १९.५ षटकात सर्वबाद १४७ धावसंख्येवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा कर्णधार-विकेटकीपर स्कॉट एडवर्ड्सने केल्या. त्याने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी सलमान मिर्जाची उत्तम ठरली. त्याने ३.५ षटकात २४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू असून त्यांनी १० षटकात ९० धावा केल्या असून २ विकेट्स गमावले आहेत. सईम आयुब २४ धावा आणि सलमान १२ धावा करत बाद झाले.






