Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टीव स्मिथ पुन्हा बनला अश्विनची शिकार, कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘असा’ प्रकार

स्टीव स्मिथ पुन्हा बनला अश्विनची शिकार, कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार

February 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravi Ashwin vs Steve Smith

Photo Courtesy: Twitter/BCCI/Screengrabs


ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज स्टीव स्मिथ दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात सलामीवीर डेविड वॉर्नर स्वस्तात बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ देखील शुन्य धावांवर बाद झाला. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने स्मिथला शुन्यावर तंबूत धाडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा अडचणीत आला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये खेळला गेला. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. उभय संघांतील दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मागच्या सामन्यात 37 आणि 25* असे प्रदर्शन करणारा स्टीव स्मिथ (Steve Smith) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात एकही धाव करू शकला नाही. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने टाकलेल्या 23 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्मिथने यष्टीरक्षक केएस भरत (KS Bharat) याच्या हातात विकेट गमावली. अश्विनने टाकलेल्या हा चेंडू स्मिथ डिफेंस करण्याच्या प्रयत्नात होता. पण चेंडू बॅटच्या कोपऱ्यावर लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. यष्टीपाठी उभा असलेल्या भरतने मात्र या विकेटचे महत्व लक्षात घेत अचूक झेल टिपला.

Marnus Labuschagne ✅
Steve Smith ✅@ashwinravi99 gets 2⃣ big wickets in one over 💪💥#TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/UwSIxep8q2

— BCCI (@BCCI) February 17, 2023

दरम्यान, स्मिथला या सामन्यात शुन्यावर बाद करणाऱ्या अश्विनच्या नावावर मात्र खास विक्रमाची नोंद झाली. अश्विन पहिला असा गोलंदाज ठरला आहे, ज्याने स्मिथला कसोटी सामन्यात दोन वेळा शुन्यावर बाद केले आहे. यापूर्वी 2020 साली मेलबर्न कसोटी सामन्यात अश्विनने स्मिथला शुन्यावर तंबूत धाडले होते. स्मिथच्या कसोटी कारकिर्दीत तो आतापर्यंत एकूण 8 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. यापैकी दोन वेळा ही कामगिरी अश्विनने केली. 23 व्या षटकात स्मिथची विकेट घेण्यापूर्वी अश्मिने याच षटकातील चौथ्या चेंडूवर मार्नल लाबुशेन याला पायचीत पकडले होते.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमाल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली, पण यावेळीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा घाम काढला. ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीत एकटा उस्मान ख्वाजा () 81 धावांची मोठी खेळी करू शकला. वॉर्नर आणि लाबुशेन यांनी अनुक्रमे 15 आणि 18 धावा केल्या. (IND vs AUS 2nd Test Steve Smith lost his wicket to Ravichandran Ashwin)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन


Next Post
Ravindra-Jadeja

जडेजा चमकला रे! ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या ख्वाजाची विकेट घेताच बनला विक्रमवीर

Photo Courtesy:Twitter/BCCI

याला म्हणतात फिटनेस! राहुलने टिपलेल्या 'लाजवाब' कॅचने ख्वाजा तंबूत, पाहा व्हिडिओ

Stuart Broad and James Anderson

द लिजेंड्स! ऍंडरसन-ब्रॉड जोडीने एकत्रित मिळवले 1000 कसोटी बळी, बनले इतिहासातील केवळ दुसरीच जोडी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143