क्रिकेट चाहते 22 मार्च 2024 या तारखेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या दिवसापासून आयपीएलचा 17 वा सीजन सुरू होईल. आयपीएलमध्ये प्रत्येकाची स्वतःची आवडती टीम असते. या टीमचं समर्थन करण्यासाठी चाहते कधीकधी सर्व मर्यादा ओलांडत असतात. तसेच आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. याआधी सोशल मीडियावर एका पोस्टने चाहत्यांना धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव बदलले जाऊ शकते. मात्र, याबाबत फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आता IPL 2024 ची तयारी सुरू केली आहे. मात्र त्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नाव बदलण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
याबरोबरच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे नाव बदलून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत 19 मार्च रोजी आरसीबी अनबॉक्स दरम्यान याची घोषणा केली जाणार आहे. यामुळे चाहतेही या पोस्टवर कमेंट करून आपले मत मांडत आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 22 मार्चपासून आयपीएल 2024 च्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना 22 मार्च रोजी होणार आहे. याआधी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आरसीबी कॅम्पमध्ये सामील झाला आहे.
https://twitter.com/Trend_VKohli/status/1767767180698116111
दरम्यान, दुसरीकडे, चाहते आता विराट कोहलीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. विराट कोहलीबद्दल बातम्या येत आहेत की कोहली 17 मार्चपर्यंत टीम कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. तसेच विराट कोहलीने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून आजपर्यंत विराट कोहली आयपीएलमध्ये फक्त आरसीबीकडून खेळताना दिसत आहे.
याबरोबरच विराट कोहलीच्या चाहत्यांना नेहमी त्याला आरसीबीच्या जर्सीत पाहण्याची इच्छा असते.आता पुन्हा एकदा विराट कोहलीला आरसीबीच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने आतापर्यंत 237 सामने खेळले असून त्यात कोहलीने 229 डावांमध्ये 7263 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-