आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट चाहते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंना खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत. तसेच काही खेळाडूंना दुखापतही होत आहे, त्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली आहे.
याबरोबरच आयपीएलचा 17 वा हंगाम दहा दिवसांवर आला असून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. तसेच आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आरसीबी कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. ज्याचा व्हिडिओ आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओ शेअर करताना आरसीबीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘कॅप्टन फॅन्टास्टिक होमकमिंग’. तर दुसरीकडे, विराट कोहलीची आरसीबी कॅम्पमध्ये सहभागी होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
आरसीबीने दोन वर्षांपूर्वी २०२१ च्या आयपीएलच्या शेवटी विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि खेळाडू फाफ डू प्लेसिसला आरसीबीचा कर्णधार म्हणून घोषित केले होते. याबरोबरच 2008 पासून विराट कोहली RCB कडून खेळतोय आणि आयपीएल इतिहासात एकाच फ्रँचायझीकडून 16 वर्ष खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे.
https://www.instagram.com/p/C4aauNgiwuZ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात आहे. तसेच दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत फाफ डु प्लेसेस याने गोलंदाजांची धुलाई केली होती.
RCBच्या IPL 2024च्या पहिल्या टप्प्यातील लढती
22 मार्च- चेन्नई विरुद्ध बेंगळुरू- रात्री 8 वाजता, चेन्नई.
25 मार्च- बेंगळुरू विरुद्ध पंजाब- रात्री 7.30 वाजता, बेंगळुरू
29 मार्च- बेंगळुरू विरुद्ध कोलकाता- रात्री 7.30 वाजता, बेंगळुरू.
02 एप्रिल- बेंगलुरू विरुद्ध लखनौ- रात्री 7.30 वाजता, बेंगळुरू.
06 एप्रिल- राजस्थान विरुद्ध बेंगळुरू- रात्री 7.30 वाजता, जयपूर
महत्त्वाच्या बातम्या-