वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच मुंबई इंडियन्सला 113 धावांवर रोखलं होतं. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना 7 विकेटने जिंकला आणि प्लेऑफसाठीही पात्र ठरले आहेत. तसेच या सामन्यात आरसीबीची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीचा जलवा पहायला मिळाला आहे.
या सामन्यात एकटी एलिस पेरी मुंबई इंडियन्सवर पुरून उरली आहे. तर या सामन्यात पेरीने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. यामुळे एलिस पेरी आता सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सनंतर आता आरसीबी प्लेऑफ्समध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. एलिस पेरी आरसीबीसाठी मॅच विनर ठरली आहे.
याबरोबरच मुंबई इंडियन्सला 113 धावांवर गुंडाळण्यात एलिस पेरी (Ellyse Perry) हिचे सर्वात महत्वाचे योगदान राहिले. पेरीने 4 षटकात 15 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. तसेच फलंदाजी करताना 38 चेंडूत सर्वाधिक 40* धावांची खेळीही तिनेच केली होती. तर या सामन्यात एस सजना 30, नॅट सायव्हर 10, हरमनप्रीत कौर 0, अमेलिया केर 2, अमनजोत कौर 4, पूजा वस्त्राकार 6 अशा विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे मन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील हा सर्वात बेस्ट स्पेल ठरला आहे.
10th March 2024 – Heartbreak for RCB 💔
12th March 2024 – RCB Qualify for Eliminator 😍Reason :-
Perry with the ball (6 wickets)
Perry with the bat (40* Runs)
Perry hitting the winning runs #RCBvMI #EllysePerry #WPL2024#rcbvsmi #RCBpic.twitter.com/c7CGczOvWi— Richard Kettleborough (@RichKettle07) March 12, 2024
दरम्यान, वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील टॉप 3 चे संघ ठरले आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एन्ट्री मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा रनरेट पाहता गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहील असंच चित्र आहे. त्यामुळे बाद फेरीतील एकमेव सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळु हे संघ आमनेसामने येतील यात शंका नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024 : अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्कर समोर इशान किशनची बोलती बंद! खाली पडला अन्…
- हिटमॅन रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नाही तर या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री, पाहा व्हिडिओ