आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा जोर आता सगळीकडे हळू हळू चढू लागला आहे. तर खेळाडूंचा गोतावळा आता एका ठिकाणी जमू लागला आहे. तसेच स्पर्धेपूर्वीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आहेत त्या सर्व अस्त्र शस्त्रांना धार चढवली जात आहे. असंच मुंबईच्या ताफ्यातल्या अर्जुनास्त्र तापून सुलाखून निघाल्याचं दिसत आहे. त्याची अनुभूती इशान किशनला सध्या आली आहे.
याबरोबरच आयपीएल म्हंटलं तर नवोदित खेळाडू त्याच्या क्षमतेने सामन्याचं रुपडं पालटण्याची क्षमता ठेवतात. यातूनच राष्ट्रीय टीमसाठी खेळाडूंची निवड करण्यास सोपं जातं. जवळपास दोन महिने चालण्याऱ्या क्रिकेट कुंभात अनेक खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झाले आहेत. . याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून आयपीएलसाठी तयारी करत असलेल्या इशान किशनला आली आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामाची तयारी करत असताना इशान किशन नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना समोर अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. इशानला नेहमीप्रमाणे वाटलं, पण त्याच्या गोलंदाजीला चढलेली धार पाहून तोही आवाक् झाला आहे. इशान किशन बॅटिंग करत होता. यावेळी अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर टाकला. हा यॉर्कर इतका परफेक्ट होता की त्याला काही कळलंच. चेंडूवर जाताना जमीनवर पडला. इतकंच काय तर हातून बॅटही सुटली आहे.
अशातच अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये मागच्या हंगामात पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याने 3 विकेट्स देखील घेतल्या होत्या. तसेच मागच्या हंगामात त्याच्यावर सगळीकडून बरीच टीका झाली होती. यामुळे या हंगामात त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याचं पहायला मिळालं आहे.
Just Arjun doing 𝘈𝘳𝘫𝘶𝘯 things 🏹😉#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/Sv7eObeFSO
— Mumbai Indians (@mipaltan) March 12, 2024
दरम्यान, या हंगामात दुसरीकडे, इशान किशनच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. कारण दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघारी आल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. तर बीसीसीआयने रणजी ट्रॉफी खेळण्याची सूचना केली होती. मात्र त्याकडेही कानाडोळा केला होता. त्यामुळे आता मात्र आयपीएलमधील कामगिरीवर त्याचं भवितव्य ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 साठी:- रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- हिटमॅन रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नाही तर या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री, पाहा व्हिडिओ
- IPL 2024 : माजी क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला लगावला खोचक टोला, म्हणाला, ‘आयपीएलपूर्वी तुम्ही फिट व्हा…