आयपीएल 2024 सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहे. यादरम्यान काही खेळाडूंना दुखापतही होत आहे, त्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली आहे. आता या दुखापतच्या यादीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाचे नावही जोडले गेले आहे, त्यामुळे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मोठा धक्का बसला आहे. तर पाथीरानाला डाव्या पायात दुखापत झाली आहे त्यामुळे तो आयपीएलच्या पहिल्या सामन्याला उपलब्ध असणार नाही. याआधी फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हन बाबत महेंद्रसिंग धोनीचे टेन्शन वाढवले आहे.
याबरोबरच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2024 च्या लिलावानंतर, चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्लेइंग 11 कसा असेल याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
अशातच सहा मार्च रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला डाव्या पायाला दुखापत झाली होती. तर त्या सामन्यात पाथिरानाने 3.4 षटके टाकली, ज्यात त्याने 28 धावा देत दोन गडी बाद केले होते. तसेच श्रीलंका क्रिकेटने पुष्टी केली आहे की, मथिशा पाथिराना दुखापतीमुळे तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे.
दरम्यान, CSK ने लिलावात 6 खेळाडूंना खरेदी केले असून यामध्ये शार्दुल ठाकूर (4 कोटी), रचिन रवींद्र (1.80 कोटी), डॅरिल मिशेल (14 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), मुस्तफिजूर रहमान (2 कोटी), अरावेली अवनीश (20 लाखांमध्ये खरेदी) या खेळाडूंना लिलावात खरेदी केले होते.
आयपीएल 2024 साठी सीएसके संघ – एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, महेश तिक्ष्णा, मिचेल सँटनर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, शेख रशीद, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, अजय मंडल, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रवींद्र, अवनीश राव अरवेली.
महत्त्वाच्या बातम्या-
- WPL 2024 : एकटी एलिस पेरी मुंबई इंडियन्सवर पडली भारी; अन् घडवला इतिहास
- IPL 2024 : अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्कर समोर इशान किशनची बोलती बंद! खाली पडला अन्…