---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदकांचे आयफेल टॉवरशी आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

Paris Olympic Medals
---Advertisement---

Paris Olympics Medal : जगभरातील क्रीडापटू आणि चाहते यांची जवळपास तीन वर्षांची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांत प्रतीक्षा संपणार आहे. खेळांचा महाकुंभ म्हटले जाणारे ऑलिम्पिक यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये खेळवले जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी क्रीडाप्रेमींच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 206 देशांतील दहा हजार पाचशे (10,500) खेळाडू पदकांच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. क्रीडा जगतातील सर्वात मानाचे पदक जिंकण्यासाठी प्रत्येक देशाचे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. ऑलिम्पिकमध्ये तीन प्रकारची पदके असतात. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सुवर्ण पदक, त्यानंतर रौप्य पदक आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला कांस्य पदक दिले जाते. पॅरिस ऑलिम्पिकसाठी बनवलेली पदके यावेळी काहीशी खास असणार आहेत.

ऑलिम्पिकचे आयोजन हे कोणत्याही देशासाठी सोपे काम नसते. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी एकूण 61,500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यावेळी पॅरिस व्यतिरिक्त फ्रान्समधील 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांबद्दल बोलायचे झाले तर, यावेळची पदके वेगळीच नाहीत तर खूप खास आहेत.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या पदकांत आयफेल टॉवरमधील लोखंडाचा तुकडा टाकण्यात आला आहे. प्रत्येक पदकामधील आयफेल टॉवरच्या तुकड्याचे वजन 18 ग्रॅम आहे. त्याची जाडी 9.2 मिमी आहे तर व्यास 85 मिमी आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी एकूण 5084 पदके तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये सुवर्णपदकाचे वजन 529 ग्रॅम आणि रौप्य पदकाचे वजन 525 ग्रॅम आहे. तर कांस्यपदक 455 ग्रॅमचे असेल.

यावेळी भारतीय पथकाकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदके जिंकली होती. यंदा ही संख्या 10 होऊ शकते.

हेही वाचा – 

जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!
आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान

खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---