ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मॅडिसन विल्सनबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ती एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी आहे. मात्र तिच्याबद्दल फार कमी क्रिकेट चाहत्यांना माहिती असेल.
मॅडिसन विल्सन ही जलतरण विश्वातील एक मोठी सुपरस्टार आहे. तिनं रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं होतं. पण यावेळी ती गर्भवती असल्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाहीये.
वास्तविक, मॅडिसन विल्सन ही ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू मॅथ्यू शॉर्ट याची पत्नी आहे. मॅडिसन एक व्यावसायिक जलतरणपटू असून तिनं ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकली आहेत. 2017 मध्ये तिला ‘मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’नं सन्मानित करण्यात आलं होतं. ती सहा विश्वविक्रमी ऑस्ट्रेलियन रिले संघांची सदस्य राहिली आहे.
मात्र मॅडिसन विल्सन यावेळी पॅरिस ऑलिम्पिकचा भाग नाही. विल्सन गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ती पॅरिस ऑलिम्पिकचा भाग होऊ शकली नाही. वास्तविक, बॅकस्ट्रोक आणि फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये मध्ये पारंगत असलेल्या मॅडिसन विल्सननं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला नाही तेव्हा चाहत्यांना आश्चर्य वाटलं होतं. परंतु त्यानंतर ती गर्भवती असल्याची बातमी समोर आली.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅथ्यू शॉर्ट हा लोकप्रिय टी20 क्रिकेटपटू आहे. मॅथ्यू शॉर्टनं आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचं प्रतिनिधित्व केलं आहे. अलीकडेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय आणि टी20 सामन्यांची मालिका खेळली गेली होती. मॅथ्यू शॉर्ट या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा एक भाग होता.
पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. 15 दिवस चालणारी ही स्पर्धा 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
हेही वाचा –
“आपल्या सर्वांना एक दिवस जायचं आहे, पण…”; कर्करोगाशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला कपिल देवचा आधार
‘खेलो इंडिया’साठी अर्थमंत्र्यांनी उघडली तिजोरी, वाचा यंदाच्या अर्थसंकल्पातून क्रीडा मंत्रालयाला काय मिळाले?
मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाला नवा अध्यक्ष,संजय नाईक यांचा दारुण पराभव