---Advertisement---

टी20 मालिकेपूर्वी भारताच्या ताफ्यात वादंग! चौकारावरुन हार्दिक आणि सहाय्यक प्रशिक्षक आमनेसामने

Hardik Pandya, Abhishek nayar
---Advertisement---

Hardik Pandya – Abhishek Nayar :- नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेला पोहोचला असून मंगळवारी (23 जुलै) खेळाडूंनी पल्लेकल्ले येथे सरावही केला. या सराव सत्रातील खेळाडूंचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. यादरम्यान सराव सत्रात अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यात किरकोळ वाद झाला आहे.

त्याचे झाले असे की, सराव सत्रादरम्यान हार्दिक पांड्याने नवीन सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली फलंदाजी केली. सरावादरम्यान पांड्याने पॉइंट्सच्या दिशेने शॉट खेळला. ज्यानंतर हार्दिकने दावा केला की हा चौकार होता. पण हार्दिकशी असहमत अभिषेक नायर म्हणाला की नाही, हा चौकार नव्हता, मी तिथे एक क्षेत्ररक्षक ठेवला होता. पण तो क्षेत्ररक्षक हार्दिकच्या नजरेस न पडल्याने त्याने क्षेत्ररक्षक कुठे आहे असा प्रश्न केला. यावर नायरने त्या भागात उभ्या असलेल्या रेव्हस्पोर्ट्सच्या पत्रकाराकडे बोट दाखवले. यानंतर हार्दिक आणि अभिषेक या प्रकरणावरुन हसायला लागले.

यापूर्वी हार्दिक आणि नायरचा गळाभेट घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. श्रीलंकेसाठी निघताना मुंबई विमानतळावर दोघे एकमेकांना मिठी मारताना कॅमेरात कैद झाले होते.

रम्यान भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेची सुरुवात 27 आणि 28 जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी आणि दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्यानंतर शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदकांचे आयफेल टॉवरशी आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान

खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---