---Advertisement---

“हार्दिकला कर्णधार न केल्याचे आश्चर्य वाटले नाही”, प्रशिक्षक गंभीरच्या निर्णयावर स्पष्टच बोलला नेहरा

Aashish-Nehra-Hardik-Pandya
---Advertisement---

Ashish Nehra On Hardik Pandya Captaincy :- भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला 27 जुलै पासून सुरुवात होणार आहे. तर या दाैऱ्यासाठी बीसीसीआयने 18 जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा केली. ज्यामध्ये बीसीसीआयकडून अनेक आश्चर्यचकित निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वाधिक आश्चर्यकारक निर्णय हा भारतीय टी20 संघाचे‌ नेतृत्व हार्दिक पांड्या याच्याकडे न देता सूर्यकुमार यादव याच्याकडे जाण्याचा होता. या निर्णयाची सगळीकडे जोरदार चर्चा झाली. आता त्याबाबत गुजरात टायटन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक व माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने मत व्यक्त केले आहे.

टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक या संघात केवळ खेळाडू म्हणून सहभागी होईल. त्याचे उपकर्णधारपदही शुबमन गिल याला देण्यात आले आहे. मात्र, कर्णधारपदाचा दावेदार असताना त्याच्यावर ही वेळ आली. सूर्यकुमार याला कर्णधार बनवण्यात नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

नेहरा याला याबाबत विचारले असता तो म्हणाला, “मला या निर्णयाचे फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण, प्रत्येक मुख्य प्रशिक्षक येताना काहीतरी वेगळे विचार घेऊन येतो. गंभीरला कदाचित तो त्याच्या डोक्यात असलेल्या योजनांमध्ये योग्य वाटला नसावा. माझ्यामते, हार्दिक सातत्याने दुखापतग्रस्त असतो ही गोष्ट त्याच्या विरोधात गेली असावी. संघाला नेहमीच एक पूर्णवेळ कर्णधार हवा असतो.” श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी देखील त्याची निवड न होण्यासाठी हेच कारण दिले होते.

नेहरा याच्याच मार्गदर्शनात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून हार्दिकने आपले कर्णधारपदाचे पदार्पण केले होते. पहिल्याच हंगामात या जोडीने संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा कारनामा केला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने त्यांना पराभूत करत विजेतेपद जिंकले. मात्र, आयपीएल 2024 मध्ये हार्दिक याने गुजरात संघाची साथ सोडली. सध्या नेहरा हा देखील गुजरात टायटन्स संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार असल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!
आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान
ब्रायन लाराचा महान रेकाॅर्ड मोडीत काढणार इग्लंडचा ‘हा’ दिग्गज खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---