वेस्ट इंडिजचा (West Indies) दिग्गज खेळाडू ‘ब्रायन लारा’च्या नावावर अनेक मोठे रोकाॅर्ड आहेत. त्यामधील काही रेकाॅर्ड मोडीत काढणे कोणत्याही फलंदाजासाठी एवढं सोपं नाही. परंतू, येत्या काही दिवसातच इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रुट (Joe Root) ब्रायन लाराचा (Brian Lara) एक रेकाॅर्ड मोडीत काढू शकतो. सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील फक्त शेवटचा सामना राहिला आहे. तो 26 जुलैपासून एजबेस्टन मैदानावर खेळला जाणार आहे.
26 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रुट (Joe Root) 14 धावा करण्यात यशस्वी झाला तर तो ब्रायन लाराचा एक रेकाॅर्ड मोडीत काढेल. रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ब्रायन लाराला (Brian Lara) मागे टाकेल.
जो रुटनं (Joe Root) आतापर्यंत 142 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 260 डावांमध्ये 49.95च्या सरासरीनं 11,940 धावा केल्या आहेत. तर ब्रायन लारानं आपल्या कसोटी कारकिर्दीत 11,953 धावा केल्या आहेत. लाराचं रेकाॅर्ड मोडण्यापासून रुटला फक्त 14 धावांची गरज आहे. लारानं आपल्या कसोटी कारकिर्दीत 34 शतके झळकावली. या बाबतीत सुद्धा जो रुट (Joe Root) लाराची बरोबरी करु शकतो. रुटनं कसोटीत आतापर्यंत 32 शतके झळकावली आहेत.
जो रुट (Joe Root) 33 वर्षाचा आहे. त्यानं 142 कसोटी, 171 एकदिवसीय आणि 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 171 एकदिवसीय सामन्यात त्यानं आतापर्यंत 6,522 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 47.60 राहिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 39 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 133 आहे. 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं 893 धावा केल्या आहेत, तर यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 90 आहे. टी20 आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 35.72 आहे. या फाॅरमॅटमध्ये त्याच्या नावावर 5 अर्धशतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हार्दिकला अष्टपैलू म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं’, माजी प्रशिक्षकानं घेतलं धारेवर
आशिष नेहरा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक का नव्हता? समोर आलं मोठं कारण
“कसोटीमध्ये आम्ही एका दिवसात 600 धावा करु शकतो”, इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा दावा