महिला प्रीमियर लीगच्या (WPL) आगामी 2027 हंगामासाठी पाचही संघांचे अंतिम टीम निश्चित झाले आहेत. WPL चा पाचवा हंगाम 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहे. या हंगामाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
WPL 2027 चा मिनी-लिलाव बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी कोची येथे पार पडला. या लिलावात एकूण 150 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पाच फ्रँचायझींकडे एकूण 27 जागा रिक्त होत्या, ज्यापैकी 25 खेळाडूंना विविध संघांनी विकत घेतले.
यूपी वॉरियर्स (UP Warriorz) संघाने सर्वाधिक खेळाडूंना आपल्या संघात सामील केले, त्यांनी 8 खेळाडूंना विकत घेतले. विशेष म्हणजे, या फ्रँचायझीने आपल्याकडील सर्व 8 रिक्त जागा भरल्या आहेत. यासह, आगामी हंगामासाठी पाचही संघांचे अंतिम संघ आता पूर्ण झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू सोफी मोलिनक्स ही WPL 2027 च्या मिनी-लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. यूपी वॉरियर्सने तिला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले, तर तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. याव्यतिरिक्त, यूपी वॉरियर्सने भारतीय खेळाडू स्नेह राणा हिला 30 लाख रुपयांना विकत घेतले. तसेच, ग्रेस हॅरिस आणि कॅथरीन ब्राइस यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
लिलावापूर्वी यूपी वॉरियर्सने 10 खेळाडूंना कायम (रिटेन) ठेवले होते. आता सर्व 8 रिक्त जागा भरल्यामुळे, संघाने आपला पूर्ण संघ फायनल केला आहे. लिलावापूर्वी यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक म्हणजेच 8 रिक्त जागा होत्या. मुंबई इंडियन्सकडे 6, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्रत्येकी 5, तर गुजरात जायंट्सकडे 3 रिक्त जागा होत्या.
यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या संघांनी आपापल्या सर्व रिक्त जागा भरल्या आहेत. दुसरीकडे, RCB आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी 4 खेळाडूंची खरेदी केली, ज्यामुळे या दोन्ही संघांसाठी एक स्लॉट रिकामा राहिला.
कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?
यूपी वॉरियर्स :
सोफी मोलिन्यूक्स – 1.10 कोटी
स्नेह राणा – 30 लाख
ग्रेस हॅरिस – 30 लाख
सुषमा वर्मा – 30 लाख
कॅथरीन ब्राइस – 10 लाख
मनाली दक्षिणी – 10 लाख
स्नेहा पवार – 10 लाख
आशा शोभना – 10 लाख
मुंबई इंडियन्स :
श्वेता सेहरावत – 20 लाख
अक्षिता भगत – 10 लाख
सानिका चालके – 10 लाख
भारती रावल – 10 लाख
लतिका इनामदार – 10 लाख
दिशा कसाट – 10 लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
जेस जोनासन – 40 लाख
क्लो ट्रायॉन – 30 लाख
तेजल हसबनीस – 30 लाख
वृंदा दिनेश – 10 लाख
दिल्ली कॅपिटल्स :
किरण नवगिरे – 75 लाख
काश्वी कंदिकुप्पा – 10 लाख
किर्स्टी गॉर्डन – 10 लाख
नजमा खान – 10 लाख
गुजरात जायंट्स :
जी कमलिनी – 40 लाख
ऑर्ला प्रेंडरगास्ट – 30 लाख
समायरा राघव – 10 लाख
WPL 2027 साठी पाचही संघांचे अंतिम स्क्वॉड
मुंबई इंडियन्स (MI) – अमनजोत कौर, अमेलिया केर, हरमनप्रीत कौर, हेले मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, निकोला कॅरी, राहिला फिरदौस, सजना सजीवन, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, वैष्णवी शर्मा, सानिका चालके, श्वेता सेहरावत आणि अक्षिता भगत, तारा नोरिस, भारती रावल, दिशा कासट, लतिका इनामदार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) – अरुंधती रेड्डी, एलिस पेरी, जॉर्जिया वोल, लॉरेन बेल, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, प्रथ्योषा कुमार, प्रेमा रावत, राधा यादव, ऋचा घोष, सयाली सतघरे, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, जेस जोनासन, तेजल हसबनीस, वृंदा दिनेश आणि क्लो ट्रायॉन.
यूपी वॉरियर्स (UPW) – दीप्ती शर्मा, हरलीन देओल, क्रांती गौड, मनाली दक्षिणी, सहाना पवार, आशा शोभना, प्रतिका रावल, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, स्नेह राणा, सुषमा वर्मा, ग्रेस हॅरिस, कॅथरीन ब्राइस, मेग लॅनिंग, फोबी लिचफिल्ड, सोफी एक्लेस्टोन, आणि सोफी मोलिन्यूक्स.
गुजरात जायंट्स (GG) -अनुष्का शर्मा, अॅश्ले गार्डनर, बेथ मूनी, भारती फुलमाली, जॉर्जिया वेअरहॅम, हॅप्पी कुमारी, जिंतिमणी कलिता, कनिका आहुजा, काश्वी गौतम, किम गर्थ, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकुर, सोफी डिव्हाइन, तनुजा कंवर, यास्तिका भाटिया, हॅपी कुमारी, ऑर्ला प्रेंडरगास्ट आणि समायरा राघव.
दिल्ली कॅपिटल्स (DC) – एनाबेल सदरलँड, चिनेल हेन्री, दीया यादव, जेमिमा रॉड्रिग्स, लॉरा वोल्वार्ड्ट, लुसी हॅमिल्टन, ममता मादीवाला, मारिझन कॅप, मिन्नू मणी, एन श्री चरणानी, नंदिनी शर्मा, निकी प्रसाद, शेफाली वर्मा, किरण नवगिरे, किर्स्टी गॉर्डन, उमा काश्वी आणि नजमा खान.






