---Advertisement---

आयपीएल 2023मधील सीएसकेचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, ‘थाला’ चेन्नईला पाचव्यांदा बनवणार का चॅम्पियन?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 17, 2023 6:19 PM
MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 16व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात कोणत्या संघात होणार हेदेखील ठरले आहे. ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच, स्पर्धेतील साखळी सामन्यांचा शेवट 21 मे रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने-सामने येणार आहेत. विशेष म्हणजे, गुजरातने मागील हंगामात स्पर्धेचे पहिले-वहिले विजेतेपद पटकावले होते. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघाने तब्बल 4 वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ ब गटात आहेत. या स्पर्धेतील चेन्नई संघाचे 7 सामने हे घरच्या मैदानावर पार पडणार आहेत, तर उर्वरित 7 सामने हे विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर होणार आहेत. अशात आपण चेन्नई सुपर किंग्स संघाच्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील सामन्यांविषयी जाणून घेऊया…

https://twitter.com/ChennaiIPL/status/1626561614119047170

चेन्नई सुपर किंग्स संघाचे सामने
31 मार्च- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (अहमदाबाद)
3 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (चेन्नई)
8 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (मुंबई)
12 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्तान रॉयल्स (चेन्नई)
17 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (बंगळुरू)
21 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (चेन्नई)
23 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (कोलकाता)
30 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स (चेन्नई)
4 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (लखनऊ)
6 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (चेन्नई)
10 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई)
14 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नई)
20 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली)

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1626550003782262785

यावेळी पाचवे विजेतेपद पटकावण्याची अपेक्षा
चेन्नई सुपर किंग्स संघाने 2010, 2011, 2018, 2021 या चार हंगामात आयपीएलचा किताब पटकावला आहे. मागील हंगामात संघाला खास कामगिरी करता आली नव्हती. संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला होता. असेही म्हटले जात आहे की, धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. त्यामुळे संघ आणि चाहते अपेक्षा करत आहेत की, धोनी संघाला पाचव्यांदा विजेतेपद पटकावून देईल. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स हा एकमेव आयपीएल संघ आहे, ज्याने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. (chennai super kings ipl 2023 schedule match timing and venue chennai super kings read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव
BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---