Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्दिक पंड्या अन् नताशाने पुन्हा थाटला संसार; बापाच्या लग्नाच्या वरातीत मुलगाही झाला सामील

हार्दिक पंड्या अन् नताशाने पुन्हा थाटला संसार; बापाच्या लग्नाच्या वरातीत मुलगाही झाला सामील

February 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya-And-Natasa-Stankovic-Marriage

Photo Courtesy: Instagram/hardikpandya93


भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी पुन्हा एकदा संसार थाटला आहे. हार्दिक आणि नताशाचा विवाहसोहळा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे संपन्न झाला. खरं तर, हार्दिकने सन 2020मध्येच नताशासोबत कोर्ट मॅरेज केले होते. त्यावेळी कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या लग्नाला फार कमी लोकांनी हजेरी लावली होती. अशात पंड्या आणि नताशा यांनी 3 वर्षांनंतर व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून ख्रिश्चन पद्धतीने संसार थाटला आहे. विशेष म्हणजे, त्याचा मुलगा अगस्त्यही वडिलांच्या लग्नात सामील झाला होता.

हार्दिक पंड्याची इंस्टाग्राम पोस्ट
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मुलगाही दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतलेली प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करत प्रेमाच्या या बेटावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आम्ही आमच्या प्रेमाचा जल्लोष करतेवेळी आमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबत असल्याने आम्ही धन्य झालो आहोत.”

View this post on Instagram

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

संघसहकाऱ्यांकडून शुभेच्छा!
हार्दिक पंड्याच्या या पोस्टला एका तासातच 16 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 6 हजारांहून अधिक कमेंट्सचा वर्षावही झाला आहे. या फोटोवर क्रिकेटपटू आणि चाहतेही कमेंट करत आहेत. स्टार क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) याने कमेंट करत लिहिले की, “तुमचे अभिनंदन.” तसेच, ईशान किशन आणि सानिया मिर्झा यांनीही हार्दिकला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नातील पेहराव
लग्नात हार्दिक पंड्या याने काळ्या रंगाचा टक्सीडो सूट परिधान केला होता. तसेच, नताशा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) हिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या पेहरावात दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत होती. लग्नाबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यामध्ये हार्दिक बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. तसेच, त्याच्या हातात शॅम्पेनची बॉटलदेखील आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic Wedding video❤️❤️#HardikPandya • #HardikPandyaWedding pic.twitter.com/AzPrRo0E9R

— Rohan Gangta (@rohan_gangta) February 14, 2023

हार्दिकने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, नताशासोबत त्याची पहिली भेट ही नाईट क्लबमध्ये झाली होती. त्याने म्हटले होते की, नताशाला माहिती नव्हते की, तो क्रिकेटपटू आहे. त्यानंतर त्यांची ही भेट प्रेमात बदलली आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. यानंतर जानेवारी 2020मध्ये एका क्रूझवर गुडघ्यावर बसून त्याने नताशाला प्रपोज केले होते. दोघांनी साखरपुडा करत त्याच वर्षी जुलैमध्ये कोर्ट मॅरेज केले होते.

हार्दिक पंड्या याच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचं झालं, तर मागील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यात त्याने संघाला टी20 मालिका 2-1ने जिंकून दिली होती. (cricketer hardik pandya married again with natasha stankovic see the photos team india)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! ‘टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस सिद्ध करतात’, मुख्य निवडकर्त्याचा सनसनाटी खुलासा
व्हॅलेंटाईनच्या दिवशी शुबमनने शेअर केला साराने हजेरी लावलेल्या कॅफेतील फोटो, नक्की भानगड काय?


Next Post
Sourav-Ganguly-Virat-Kohli

'कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत', विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा

chetan sharma an selection committee

'आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो', स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात

Photo Courtesy: Twitter

भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आणणाऱ्या स्टिंग ऑपरेशनमधील सर्व 'खळबळजनक' दावे, वाचा एकाच क्लिकवर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143