Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा

February 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya-Natasha-And-Son

Photo Courtesy: Instagram/@hardikpandya


भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्याचवेळी संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या हा सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतोय. हार्दिक हा सध्या केवळ मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळतो. याच रिकाम्या वेळेत आता हार्दिकने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी तो उदयपूर येथे आपलीच पत्नी नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत पुनश्च लग्नगाठ बांधेल.

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, हार्दिक व नताशा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूर येथील एका शाही पॅलेसमध्ये हा समारंभ होईल. 13 ते 16 फेब्रुवारी यादरम्यान हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. नताशा ही मूळ सार्बियाची असून, तिने बॉलीवूड चित्रपटात अभिनय देखील केला होता.

हार्दिक व नताशा यांनी आपले नाते 1 जानेवारी 2020 रोजी जाहीर केले होते. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात नताशा गर्भवती असल्याचे फोटोज व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांनी घरगुती सोहळ्यातच आपले लग्न उरकून घेतले होते. या जोडप्याला अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे. नताशाही सातत्याने हार्दिक याला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर देखील उपस्थित असते.

हार्दिक याच्यासाठी मागील वर्षभराचा काळ सर्वोत्तम राहिला आहे. त्याने प्रथमच आयपीएलमध्ये नेतृत्व करताना गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. तसेच त्याच्याकडे भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व देखील देण्यात आले. लवकरच तो टी20 संघाचा नियमित कर्णधार देखील होऊ शकतो. बीसीसीआय सध्या त्याच्या नेतृत्वात आगामी 2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी करत आहे.

(Hardik Pandya And Natasha Stankovic Planned White Marriage On Valentine’s Day)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच


Next Post
Rohit-Sharma-And-Ritika-Sajdeh

इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली 'ही' मागणी; म्हणाली, 'प्लीज माझ्यासाठी...'

Rohit-Sharma

माजी प्रशिक्षकांना रोहितमध्ये दिसला पुजारा! म्हणाले, "त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण करून दिली"

Ellyse-Perry-And-Rohit-Sharma

एलिस पेरीने रचला इतिहास! बनली पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला, आता नजर विश्वचषकातील रोहितच्या 'या' विक्रमावर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143