---Advertisement---

LSG vs PBKS; टॉस पंजाबच्या बाजूने, लखनऊला फलंदाजीचे आमंत्रण!

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील तेरावा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टाॅस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या या मोसमातील कामगिरी बद्दल बोलायचे झाल्यास पंजाब किंग्जने हंगामात आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. ज्यात त्यांनी गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवला होता. तर दुसरीकडे लखनऊ आपला तिसरा सामना खेळत आहे. एलएसजीने मागील दोन सामन्यात एक सामना जिंकला तर एक हरला आहे. हैदराबादविरुद्ध संघाने विजय मिळवला होता तर दिल्ली विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

लखनऊ- एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान

पंजाब- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेंडगे, अर्शदीप सिंग, लाॅकी फर्गुयसन, मार्को जॅनसेन, युझवेंद्र चहल.

हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण फक्त 4 सामने खेळले गेले आहेत. लखनऊचा पंजाबविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर पंजाबने फक्त एकदाच लखनऊला हरवले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---