Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट

प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट

February 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant-And-Isha-Negi

Photo Courtesy: Instagram/rishabpant & ishanegi_


भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा रस्ते अपघात झाल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याला क्रिकेट मैदानापासून दूर राहून आता 40 दिवस उलटले आहेत. त्याच्यावर मागील महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्या सर्जरीनंतर शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) पंतने त्याचा पहिला फोटो शेअर केला होता. यात तो वॉकरसोबत चालताना दिसला होता. या फोटोवर त्याच्या संघसहकाऱ्यांसोबतच चाहत्यांनीही कमेंट्सद्वारे त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. मात्र, या फोटोवर रिषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिने एक कमेंट केली, ज्याची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया…

रिषभ पंतची पोस्ट
रिषभ पंत (Rishabh Pant) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “एक पाऊल पुढे, एक पाऊल आणखी मजबूत, एक पाऊल चांगले.” हा फोटो पाहून सर्वजण तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. अशात रिषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी (Rishabh Pant Girlfriend Isha Negi) हिनेदेखील त्याच्या फोटोवर मन जिंकणारी कमेंट केली आहे.

ईशा नेगी (Isha Negi) हिने पंतच्या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे की, “फायटर.” यासोबतच तिने एका हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे. तिच्या नुसत्या कमेंटलाच 20 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. काहींनी तिच्या कमेंटवर प्रत्युत्तर देत असेही लिहिले आहे की, “वहिनी भैय्याची काळजी घ्या. तो आमच्यासाठी चॅम्पियन खेळाडू आहे. आम्ही त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खूप मिस करत आहोत.” अशाप्रकारे तिची कमेंट व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Rishabh-Pant-Post
Photo Courtesy: Instagram/rishabpant

कोण आहे ईशा नेगी?
ईशा नेगी ही मूळची उत्तराखंड येथील रहिवासी आहे. तिचे शिक्षण दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी स्कूलमधून झाले आहे. ती एक इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करते. सोशल मीडियावरही ती खूपच लोकप्रिय आहे. तिला इंस्टाग्रामवर तब्बल 14 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात.

सन 2020पासून रिलेशनशिपमध्ये?
रिषभ पंत याने सन 2020मध्ये स्वत: त्याचा आणि ईशाचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, दोघांनीही कधीच त्यांच्या रिलेशनशिपवर मोकळेपणाने भाष्य केले नाही.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

रिषभ पंतचा अपघात
खरं तर, 29 डिसेंबर रोजी एका रस्ते अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या गाडीला आग लागली होती. मात्र, पंतला वेळीच बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो वेगाने बरा होत आहे. डॉक्टरांनीही सांगितले होते की, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी जवळपास 6 ते 9 महिन्यांचा वेळ लागू शकतो.

रिषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हा पुनरागमन करणार हे अद्याप स्पष्ट नाहीये. मात्र, तो या वर्षी अधिकतर महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील महिन्यात झालेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतूनही तो बाहेर होता. तसेच, सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेसाठी संघात निवडले नाहीये. इतकेच नाही, तर आयपीएल आणि आशिया चषकातूनही तो बाहेर राहण्याची शक्यता आहे. वनडे विश्वचषकातही पंतच्या सहभागाबद्दल स्पष्टता नाहीये. (cricketer rishabh pant girlfriend isha negi comment on pant instagram photo said he is a fighter photo viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर


Next Post
Mumbai Shree

मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

Jaydev-Unadkat

टीम इंडियाला झटका! दुसऱ्या कसोटीपूर्वीच बीसीसीआयने 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, कारण घ्या जाणून

Hardik-Pandya-Natasha-And-Son

हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143