Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

February 12, 2023
in अन्य खेळ, टॉप बातम्या
Mumbai Shree

Photo Courtesy:vFile Photo


मुंबई, दि.११ (क्री.प्र.)- फिटनेसच्या आवडीपोटी जिमच्या पायर्‍या चढणार्‍या तरूणांना शरीरसौष्ठवाची लागलेली चटक भागवता यावी, तसेच उदयोन्मुख आणि ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ज्यूनियर मुंबई श्री ही जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा उद्या रविवारी १२ फेब्रूवारीला राम मंदिर रोडच्या पश्चिमेला स्कोडा सर्व्हिस सेंटरच्या मागे असलेल्या एफएम रोलेक्स बँक्वेटमध्ये रंगणार आहे. ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या संधीचे पहिले पाऊल असलेल्या या स्पर्धेत सुमारे १०० पेक्षा अधिक खेळाडू आपल्या नव्या कोर्‍या शरीरयष्टीला लोकांसमोर फुगवणार असून या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला मिळेल.

या स्पर्धेत आजच्या तरूणाईचा आवडता प्रकार असलेल्या फिटनेस फिजीक्स प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फिट असलेली तरूणाई वेगळ्या पोझेस मारताना दिसेलच पण या स्पर्धेबरोबर दिव्यांग आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मास्टर्सच्या गटात ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील असे तीन गट असतील. तसेच दिव्यांग खेळाडूचेही ५५ किलो आणि ५५ किलोवरील असे दोन गट खेळविले जाणार आहेत. जे निश्चितच या स्पर्धेचे खास आकर्षण असेल. मेन्स फिटनेस फिजीकचेही १६५ सेमी आणि १६५ सेंमीवरील उंचीचे असे दोन गट उतरणार आहेत.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य मधुकर तळवलकर, जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, अ‍ॅड. विक्रम रोठे, भारतीय शरीरसौष्ठवाच्या अध्यक्षा हिरल सेठ, मुंबई उपनगर शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, युवासेना सदस्य प्रवीण पाटकर आणि अजय खानविलकर हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

शरीरसौष्ठव खेळाची बालवाडी असलेल्या स्पर्धेसाठी मुंबईकर ज्यूनियर खेळाडू गेले तीन-चार महिने जोरदार व्यायाम करीत आहेत. या स्पर्धेत आपल्या फार मो खेळाडू पाहण्याची संधी नसली तरी सहभागी स्पर्धक भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतील असा विश्वास मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे (एमएसबीबीएफए) अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला. मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस (एमएसबीबीएफए) आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या (जीबीबीबीए) संयुक्त आयोजनाखाली ही स्पर्धा रंगणार असून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाचे चाणक्य असलेल्या विक्रम रोठे यांच्या पुढाकाराने आणि स्ट्राँग नेशन सप्लिमेंटच्या सहकार्याने ज्युनियर मुंबई श्रीच्या विजेत्यांवर दोन लाखांपेक्षा अधिक रोख बक्षीसांचा वर्षाव विजेत्यांवर केला जाणार आहे. एकंदर सहा गटांच्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल ५ खेळाडूंना ५, ४, ३, २, १ हजार रुपयांचे इनाम दिले जाईल. स्पर्धेचा विजेता १५ हजार रूपयांच्या रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल, अशी माहिती एमएसबीबीएफएचे सरटिचणीस सुनील शेगडे यांनी दिली.

स्पर्धेत खेळाडूंचा प्रतिसाद पाहाता संघटनेने स्पर्धेची वजन तपासणी आणि उंची तपासणी शनिवारी सकाळी ११ ते २ यावेळेत स्पर्धा स्थळीच घेतली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणार्‍या खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहावे , असे आवाहन सरचिटणीस सुनील शेगडे यांनी केलेय. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश सावंत, सुनील शेगडे संतोष पवार आणि विजय झगडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन खेळाडूंना करण्यात आले आहे. (Mumbai Shree District Championship Bodybuilding Competition on Sunday)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत मोठा बदल? बीसीसीआय लवकरच घेऊ शकते निर्णय
‘मी असं कधीच केलं नाही…’, खेळपट्टीवर नाराज ऑसी खेळाडूंना डेल स्टेनचा सल्ला


Next Post
Jaydev-Unadkat

टीम इंडियाला झटका! दुसऱ्या कसोटीपूर्वीच बीसीसीआयने 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, कारण घ्या जाणून

Hardik-Pandya-Natasha-And-Son

हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा

Rohit-Sharma-And-Ritika-Sajdeh

इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली 'ही' मागणी; म्हणाली, 'प्लीज माझ्यासाठी...'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143