---Advertisement---

KKR vs PBKS: केकेआरचा भेदक गोलंदाजी मारा, पंजाब 111 धावांवर गार

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 31वा सामना आज (15 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) संघात खेळला जात आहे. हा सामना पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि कोलकाता नाईट रायडर्सला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान पंजाबने केकेआरसमोर 112 धावांचे आव्हान ठेवले आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्सचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला नाही. पंजाबसाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरण सिंग यांनी सलामी दिली होती. दरम्यान दोन्ही खेळाडू अनुक्रमे 22 आणि 30 अशा धावसंख्येवर बाद झाले. दोन्ही सलामीवीरांना केकेआरचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज हर्षित राणाने तंबूत पाठवले. त्यानंतर केकेआरला चॅम्पियन करणारा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता, पण तो खातेही उघडू शकला नाही. हर्षित राणाने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि तिसरी विकेट आपल्या नावावर केली. सलामीवीरांनंतर पंजाबसाठी कोणताही फलंदाज 20 धावांचा आकडा गाठू शकला नाही.

केकेआरसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाने 3 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच एनरिक नॉर्खिया आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11-

पंजाब किंग्स- श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरण सिंग, प्रियांश आर्य, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, नेहाल वडेरा, शशांक सिंग, मार्को यान्सन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट

कोलकाता नाईट रायडर्स- अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह,आंद्रे रसल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, एनरिक नॉर्खिया, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---