Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर

भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर

February 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Matthew-Kuhnemann

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


भारतीय संघाने नागपूर येथे पार पडलेल्या पहिला कसोटी सामना अवघ्या 3 दिवसातच जिंकला. भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी धूळ चारली. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यावर लागले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली येथे खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया दिल्ली काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अशात ऑस्ट्रेलियाने आणखी एका फिरकीपटूला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुह्नेमन हा पुढील काही दिवसात संघासोबत जोडला जाईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगितले गेले आहे की, क्वीन्सलँडचा गोलंदाज मॅथ्यू कुह्नेमन (Matthew Kuhnemann) याला भारतात पाठवले जात आहे. तो दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात सामील होईल आणि खेळण्यासाठी तयार राहील. खरं तर, ऑस्ट्रेलिया संघात सामील असलेला फिरकीपटू मिचेल स्वेप्सन (Mitchell Swepson) हा वडील बनला आहे. त्यामुळे तो ब्रिसबेनला परतणार आहे. अशात त्याची जागा भरून काढण्यासाठी मॅथ्यू याला ताफ्यात सामील करण्यात आले आहे.

Matthew Kuhnemann tells @White_Adam that he's been watching Ravindra Jadeja during the #INDvAUS series. He might get a chance to replicate him if the selection cards fall his way next week in Delhihttps://t.co/ABfDcEryQK

— Louis Cameron (@LouisDBCameron) February 12, 2023

मॅथ्यूचे कसोटीत पदार्पण
मॅथ्यू कुह्नेमन याने आतापर्यंत कसोटी पदार्पण केले नाहीये. त्याने वनडेत ऑस्ट्रेलियासाठी 4 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. 26 वर्षीय फिरकीपटू मॅथ्यू याने 12 प्रथम श्रेणी सामन्यात 32 विकेट्स नावावर केल्या आहेत.

Matthew Kuhnemann didn't expect a Test call-up but the left-arm spinner has been keeping a close eye on the Border Gavaskar Trophy…@LouisDBCameron | #INDvAUS

— cricket.com.au (@cricketcomau) February 12, 2023

दिल्लीत उतरू शकतात ‘हे’ 3 फिरकीपटू
दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू न शकलेला अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याचे संघात पुनरागमन झाले, तर ऑस्ट्रेलिया दिल्ली कसोटी (Delhi Test) सामन्यात 3 फिरकीपटूंना उतरवू शकतो. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉड मर्फी (Todd Murphy) याला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. अशात मॅथ्यू दिल्लीतून त्याच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात करू शकतो. मर्फी याची शानदार कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया संघ ऍश्टन एगर याच्या जागी नेथन लायनसोबत मॅथ्यू कुह्नेमन याला उतरवू शकतो. (ind vs aus 2nd test change in australian team after defeat in nagpur test matthew kuhnemann will join)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला मोठा झटका, स्म्रिती मंधानाला गंभीर दुखापत


Next Post
Rohit Sharma

खेळपट्टीच्या वादावर रोहितचे परखड मत! ऑस्ट्रेलियाला म्हणाला, 'तुम्ही स्किलवर...'

Ellyse-Perry

नादच खुळा! एलिसा पेरीने विश्वचषकात आणलं वादळ, 5 चेंडूत 181च्या स्ट्राईक रेटने चोपल्या 'इतक्या' धावा

Viral Video

नादखुळा कॅच! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केलंय ‘या’ कॅचचं कौतूक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143