Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला मोठा झटका, स्म्रिती मंधानाला गंभीर दुखापत

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला मोठा झटका, स्म्रिती मंधानाला गंभीर दुखापत

February 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Smriti-Mandhana

Photo Courtesy: Twitter/BCCIWomen


महिला टी-20 विश्वचषक 2023 चा पहिला चौथा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळला  जाणार आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी 6.50 वाजता कॅप टाऊनमध्ये हा सामना खेळला जाईल. पण विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळण्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा झटका बसला. संघाची सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार स्म्रिती मंधाना या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीच्या कारणास्तव स्म्रिती मंधानाने माघर घेतल्याचे सांगितले गेले आहे.

भारतीय मिला संघाचे संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी स्म्रिती मंधाना () पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली. प्रशिक्षकांनी अशीही माहिती दिली की, स्म्रितीला दुखापत जरी झाली असली, तर कुठल्याही प्रकारचे फ्रॅक्चर नाहीये. याचाच अर्थ असा होतो की, स्म्रिती विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला 15 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 विश्वचषकातील दुसरा सामना खेळायचा आहे, ज्यासाठी स्म्रिती मंधाना उपलब्ध असणे अपेक्षित आहे. यादरम्यान संघासाठी एक चांगली बातमी अशीही आहे की कर्णधार हरमनप्रीत कौर पूर्णपणे फिट आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती. पण विश्वचषकापूर्वी तिने स्वतःच्या दुखापतीवर काम करून पुनरागमन केले.

ऋषिकेश कानिटकर () यांच्याकडून स्म्रिती मंधानाच्या दुखापतीविषयी माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. हरमनप्रीत खेळण्यासाठी फिट आहे. तिने मागच्या दोन दिवसांमध्ये नेट्समध्ये फलंदाजी केली आहे आणि ती पूर्णपणे ठीक झाली आहे. स्म्रितीच्या बोटाला मात्र दुखापत झाली आहे आणि ती अजूनही यातून सावरत आहे. त्यामुळे ती मालिकेत खेळू शकणार नाही. हे फ्रँक्चर नाहीये आणि आम्हाला आशा आहे दुसऱ्या सामन्यासाठी ती उपलब्ध असेल.”

भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकासाटी तीन आठवड्यांपेक्षा अधिक सराव करण्याची वेळ मिळाली. प्रशिक्षक कानिटकर यांनी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल अशा परिस्थितीचा अभ्यास केला आणि तसाच संघ तयार केला. दीप्ति शर्मा, राधा यादव, देविका वैद्य आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या रूपात संघाकडे चार फिरकी गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

कर्नाटकच्याच दिग्गजाने काढले राहुलचे वाभाडे, म्हणाला, “तू 8 वर्षांत काय केलं?”
टी20 विश्वचषकात विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया आतुर, पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे आव्हान


Next Post
Steven Smith and David Warner

आता बास! खराब प्रदर्शनानंतर स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूचा पत्ता कट? दिल्ली कसोटीपूर्वी निर्णय

India-vs-Pakistan-Women

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते

Matthew-Kuhnemann

भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143