Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन

मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant

Photo Courtesy: Twitter/RishabhPant17


भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा 30 डिसेंबर, 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर रुग्णालयात जवळपास 1 महिना उपचार घेतल्यानंतर तो आता त्याच्या घरी पोहोचला आहे. जवळपास 40 दिवसांनंतर त्याने त्याच्या तब्येतीतील सुधारणेविषयी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांनाही आनंद झाला आहे.

रिषभ पंतचे ट्वीट
शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) रिषभ पंत (Rishabh Pant) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले. यामध्ये 25 वर्षीय पंतने दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की, त्याने चालण्यास सुरुवात केली आहे. हे फोटो ट्वीट करत त्याने मन जिंकणारे कॅप्शनही लिहिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक पाऊल पुढे, एक पाऊल आणखी मजबूत, एक पाऊल चांगले.”

One step forward
One step stronger
One step better pic.twitter.com/uMiIfd7ap5

— Rishabh Pant (@RishabhPant17) February 10, 2023

या फोटोत रिषभ वॉकरचा (दुखापत झाल्यानंतर चालण्यासाठी वापरली येणारी वस्तू) आधार घेत चालताना दिसत आहे. त्याचा उजवा पाय सुजलेलाही दिसत आहे. अशात चाहते पंतच्या सहन न होणाऱ्या वेदनेचा अंदाज लावू शकतात. रिषभच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्याच्या या ट्वीटला आतापर्यंत 70 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 3 हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, “लवकर बरे व्हा. तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर चांगले दिसता.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “लवकर पुनरागमन कर.” आणखी एकाने लिहिले की, “लवकर परत ये, कांगारूंना धुवावे लागेल.” एकाने असेही लिहिले की, “दमदार पुनरागमन कर. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पंत तयार.”

जल्दी ठीक हो जाइए। आप क्रिकेट के मैदान में अच्छे लगते हैं।

— Dilip Mandal (@Profdilipmandal) February 10, 2023

Come back Bhai …. kangaroo 🦘🦘🦘 ko dhona hoga 🔥🔥🔥

— Arup Saha (@ArupSaha3111) February 10, 2023

Comeback stronger, Pant.Ready for World Test Championship 🔥 pic.twitter.com/wFLuNv3i8d

— Subash (@SubbuSubash_17) February 10, 2023

बांगलादेशविरुद्ध खेळलेला शेवटचा सामना
रिषभ पंत याने भारतीय संघासोबत 2022च्या अखेरीस बांगलादेश दौरा केला होता. यामध्ये 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार प्रदर्शन केले होते. या कसोटी मालिकेपूर्वीच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून 46 धावांची दमदार खेळी पाहायला मिळाली होती. तसेच, दुसऱ्या सामन्यात त्याने संघाच्या पहिल्या डावादरम्यान 93 धावा चोपल्या होत्या. (cricketer rishabh pant post picture in crutches during recovery after car accident)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गडबड गोंधळ! थोडक्यात वाचला कॅप्टन रोहित, विराटलाही मागावी लागली माफी; प्रकरण जाणून घ्याच
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का! स्टार क्रिकेटरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह


Next Post
Ravindra-Jadeja-And-Rohit-Sharma

भारताने नागपुरात वापरली 2017ची रणनीती, 'हे' तीन धुरंधर नेहमीच वाजवतात विरोधी संघाची बँड; एकदा वाचाच

KL-Rahul

फ्लॉप होऊनही राहुलला फलंदाजी प्रशिक्षकाचा भक्कम पाठिंबा का? म्हणाले, 'केएलसाठी प्रामाणिकपणे सांगतो...'

Sanjay-Manjrekar-And-Murali-Vijay

'मुंबईचे माजी खेळाडू साऊथच्या खेळाडूंना चांगलं बोलत नाहीत', भारतीय दिग्गजाचा मांजरेकरांवर गंभीर आरोप

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143