Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का! स्टार क्रिकेटरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का! स्टार क्रिकेटरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Smriti-Mandhana

Photo Courtesy: Twitter/BCCIWomen


महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेला शुक्रवारपासून (दि. 10 फेब्रुवारी) केप टाऊन येथे सुरुवात होत आहे. यातील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. स्पर्धेतील तिसरा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात पार पडणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना ही सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाली होती. यादरम्यान तिच्या बोटांना दुखापत झाली होती. त्यातून ती अद्याप सावरली नाहीये. अशात ती रविवारी (दि. 12 फेब्रुवारी) पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

स्म्रीती मंधाना दुखापतग्रस्त
महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळवण्यात आले. त्यातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, तिला सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र, ती विश्वचषकातून बाहेर आहे की, खेळू शकेल हे अद्याप सांगता येणार नाही. मात्र, ती पाकिस्तानविरुद्ध खेळू शकणार नसल्याचे बोलले जात आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात स्म्रीती मंधाना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरली होती. त्यावेळी ती फक्त 3 चेंडू खेळू शकली होती. मंधाना त्या सामन्यातही खातं उघडू शकली नव्हती. भारताने त्या सामन्यात पराभव पत्करला होता. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 129 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 85 धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यातही स्म्रीती खेळू शकली नव्हती. भारताने बांगलादेशला दुसऱ्या सराव सामन्यात 52 धावांनी धूळ चारली होती.

कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिलादेखील मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात खांद्याची दुखापत झाली होती. तिने अंतिम सामन्यानंतर म्हटले होते की, विश्रांतीनंतर ती बरी होईल. भारतीय संघाला विश्वचषकात दुसऱ्या गटात पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड या संघांसोबत ठेवले गेले आहे. (womens t20 world cup 2023 smriti mandhana doubtful for pakistan match)

आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील भारतीय महिला संघाचे वेळापत्रक-
12 फेब्रुवारी- भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला- सायंकाळी 6.30 वाजता

15 फेब्रुवारी- भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला- सायंकाळी 6.30 वाजता

18 फेब्रुवारी- भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला- सायंकाळी 6.30 वाजता

20 फेब्रुवारी- भारतीय महिला विरुद्ध आयर्लंड महिला- सायंकाळी 6.30 वाजता

भारतीय महिला संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजलि सरवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“विराटची विकेट माझ्यासाठी स्पेशल”, पदार्पण गाजवणाऱ्या मर्फीची प्रांजळ कबुली
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून


Next Post
Virat-Kohli-And-Rohit-Sharma

गडबड गोंधळ! थोडक्यात वाचला कॅप्टन रोहित, विराटलाही मागावी लागली माफी; प्रकरण जाणून घ्याच

Rishabh-Pant

मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन

Ravindra-Jadeja-And-Rohit-Sharma

भारताने नागपुरात वापरली 2017ची रणनीती, 'हे' तीन धुरंधर नेहमीच वाजवतात विरोधी संघाची बँड; एकदा वाचाच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143