Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून

'सेना' देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते 'हिटमॅन'ने दाखवलं करून

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय संघाने क्रिकेटला एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूचाही समावेश आहे. रोहित सध्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. ही जबाबदारी पार पाडत असताना तो संघाला विजय मिळवून देण्यासोबतच विक्रमांचा घाटही घालताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहितने दमदार कामगिरी केलीये. त्यामुळे त्याच्यासाठी ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’ हा शब्दप्रयोग केला, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याने यादरम्यान एक शतक झळकावत एक खास विक्रम स्वत:च्या नावावर रचला आहे.

काय आहे रोहितचा विक्रम?
गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या कसोटीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने धमाका केला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवर गुंडाळल्यानंतर रोहित भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. तो दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत टिकला. मात्र, पॅट कमिन्सच्या 81व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याला बाद व्हावे लागले. यावेळी रोहितने 212 चेंडूंचा सामना करत 120 धावा चोपल्या. या धावा त्याने 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने चोपल्या. हे शतक करताच रोहित विक्रमवीर बनला.

Leading from the front 👊

An outstanding knock from the Indian skipper 👏#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/rzMJy0hmPO pic.twitter.com/DHt6JsKmLZ

— ICC (@ICC) February 10, 2023

या शतकामुळे रोहित सेना देशांविरुद्ध सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. सेना देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होतो. या देशांचे इंग्रजी आद्याक्षर घेऊन सेना हा शब्द तयार झाला आहे. त्यामुळे सेना देशांविरुद्ध सलामीवीर म्हणून रोहितने सर्वाधिक 23 शतके केली आहेत. या यादीत तो वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्स या सलामीवीरासोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी आहे. त्यानेही सेना देशांविरुद्ध सलामीला फलंदाजी करताना 23 शतके झळकावली आहेत.

याव्यतिरिक्त या यादीत दुसऱ्या स्थानी ख्रिस गेल (Chris Gayle) आहे. त्याने सेना देशांविरुद्ध सलामीला फलंदाजी करताना 22 शतके झळकावली आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने सेना देशांविरुद्ध सलामीला उतरत 20 शतके केली आहेत. (Most International Centuries against SENA teams as Opener)

सलामीला फलंदाजी करत सेना देशांविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
23 शतके- रोहित शर्मा*

23 शतके- डेसमंड हेन्स
22 शतके- ख्रिस गेल
20 शतके- सचिन तेंडुलकर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ
बुडत्याचा पाय खोलात! चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्का, दुखापतीने प्रमुख फलंदाज हॉस्पिटलमध्ये


Next Post
Photo Courtesy: Twitter/CA

मर्फीची चालली जादू! तब्बल नऊ वर्षानंतर ऑस्ट्रेलियासाठी केली कोणीतरी अशी कामगिरी

Rohit-Sharma-Century

ओपनर म्हणून कशीये रोहितची आकडेवारी? प्रत्येक चाहत्याने जाणून घेतलीच पाहिजे पठ्ठ्याची कामगिरी

Photo Courtesy: Twitter/BCCI

दुसरा दिवस रोहित-जडेजाच्या नावे! नागपूर कसोटीत टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी, मर्फीची एकाकी झुंज

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143