Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाचे कर्दनकाळ मुंबईकर! दिमाखदार शतकाने रोहितची सचिनशी बरोबरी

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतक करून खेळत असलेल्या रोहितने दुसऱ्या दिवशी एका बाजूने फलंदाज बाद होत असताना, संयम दाखवत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक पूर्ण केले. याचबरोबर त्याने भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली.

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 177 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या दिवशी 1 बाद 77 धावा काढल्या होत्या. रोहितने 69 चेंडूवर नाबाद 56 धावा पहिल्या दिवशी केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याने संयम दाखवत 177 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये 14 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी रोहितने आपल्या कारकिर्दीतील नवव्या शतकात 120 धावा केल्या. यामध्ये 15 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता.

या शतकासह रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नववे शतक झळकावले. यासह त्याने सचिन तेंडुलकर याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 9 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी केली. रोहितने आपली यापूर्वीची आठही शतके वन डे क्रिकेटमध्ये झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय वनडे शतके झळकावण्याचा मान विराट कोहली याच्याकडे जातो. विराटने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 14 शतके ठोकली आहेत.

या सामन्याचा विचार केल्यास, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांच्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर रोहित शर्माने संघाची जबाबदारी घेत भारताला पहिल्या दिवशी 1 बाद 77 अशी मजल मारून दिलेली. दुसऱ्या दिवशी इतर फलंदाज बाद होत असताना रोहितने शतक झळकावून संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.

(Rohit Sharma equals with Sachin Tendulkar for most hundreds against Australia as an opener)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…


Next Post
Todd-Murphy

भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवत मर्फीचा पदार्पणात राडा, बनला 'असा' विक्रम करणारा चौथाच ऑस्ट्रेलियन

Virat Kohli

कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ

Rohit-Sharma

'सेना' देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते 'हिटमॅन'ने दाखवलं करून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143