Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…

IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला...

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli

Photo Courtesy: twitter/cricketcomau


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र यादरम्यान संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याकडून झालेल्या 2 मोठ्या चूका संघाला महागात पडल्या.  विराट त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. पण त्याने नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन महत्त्वपुर्ण झेल सोडले. समालोचन करणारे माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्क वॉ यांनी विराटच्या झेलबद्दल भाष्य केले.

विराटने (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया संघाचा (IND vs AUS) स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि पीटर हँड्सकॉम्ब (Peter Handscomb)  यांचे झेल सोडले. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्मिथने 37 आणि हँड्सकॉम्बने 31 धावा केल्या. मार्क वॉ (Mark Waugh) समालोचन दरम्यान म्हणाले की, “जलद हालचाल करण्यासाठी, तुमचे दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत. कोहली त्याच्या क्षेत्ररक्षणावर खूप पुढे होता. तो थोडा मागे पाहिजे होता. विराट आणखी चांगले प्रदर्शन करू शकला असता. असे वाटते की त्याला हा झेल घेण्याची अपेक्षाच नव्हती.”

विराटने हे दोन्ही झेल स्लीप्समध्ये क्षेत्ररक्षण करताना सोडले. पहिला झेल त्याने 16व्या षटकात सोडला आणि स्टीव्ह स्मिथ याला जीवदान दिले. या षटाकातील पहिल्या चेंडूवर स्मिथला कव्हर ड्राईव्ह मारायचा होता, पण चेंडू त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून स्वीप्समध्ये विराटच्या हातात गेला. स्मिथचा हा झेल घेण्यासाठी विराटने प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.

यानंतर पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात विराटने (Virat Kohli) हँड्सकॉम्बचा झेल सोडला. रविंद्र जडेजाचा एक चेंडू हँड्सकॉम्बच्या बॅटच्या किनाऱ्यावर लागला आणि यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात गेला. चेंडू केएस भरतच्या (K S Bharat) ग्लोव्हजला लागून वळाला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने गेला. कोहलीने प्रयत्न केले, पण यावेळीही त्याला अपयश आले. विराट  चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि हँड्सकॉम्बला जीवदान मिळाले. (ind-vs-aus-1st-test-virat-kohlis-drop-catch-in-nagpur)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला भारताचा एक्स-फॅक्टर मानतोय पाकिस्तानी दिग्गज, म्हणाला…
रेकॉर्डब्रेकर अश्विन! अनेक दिग्गज होऊन गेले मात्र ही कामगिरी फक्त आण्णाच्याच नावे


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराहच्या फिटनेसविषयी नवी अपडेट

Rohit Sharma

रोहितचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपला, नागपूर कसोटीत ठरला ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी डोकेदुखी

Photo Courtesy: Twitter/Wisden India

भारतीय क्रिकेटचा 'रेकॉर्डपुरूष' ठरला हिटमॅन! धोनी-विराटला न जमलेली कामगिरी दाखवली करून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143