---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूची अयोध्येतील राम मंदिरात पूजा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराज नुकताच अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्याचा मंदिरातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केशव महाराजनं अयोध्येतील राम मंदिरात प्रार्थना केली आणि भगवान रामाचे आशीर्वाद घेतले.

केशव महाराजनं इंस्टाग्रामवर राम मंदिरातील स्वतःचा फोटो पोस्ट केलाय. दक्षिण आफ्रिकेचा हा फिरकीपटू भगवान रामाचा मोठा भक्त मानला जातो. महाराजनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं – “जय श्री राम, सर्वांना आशीर्वाद”.

केशव महाराजनं या आधीही भारतातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. आता या क्रिकेटपटूनं अयोध्येतील राम मंदिरात प्रार्थना केली. यावेळचा त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स विविध कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

 

केशव महाराजच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 50 कसोटी सामन्यांसह 44 एकदिवसीय आणि 27 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 31.99 ची सरासरी आणि 3.17 च्या इकॉनॉमीसह 158 बळी घतले. 129 धावांत 9 बळी ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय त्यानं 9 वेळा कसोटी सामन्यात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्यानं एका कसोटीत 10 विकेट्सही घेतल्या होत्या.

केशव महाराजनं 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30.65 ची सरासरी आणि 4.56 च्या इकॉनॉमीनं 55 बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये 33 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय, त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 27 टी-20 सामन्यांमध्ये 27.96 च्या सरासरीनं 24 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची इकॉनॉमी 7.39 एवढी राहिली. 21 धावांत 2 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

केशव महाराज गरजेच्या वेळी गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देण्यास सक्षम आहे. तो जगभरातील अनेक टी20 लीगमध्ये खेळला असला तरी मात्र त्याला आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल 2024 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सचा सदस्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 साठी एबी डिव्हिलियर्सचं भाकीत, म्हणाला, ‘हा’ भारतीय खेळाडू करेल दमदार कामगिरी

IPL 2024 मध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? काय असेल त्याची संघातील भूमिका?

आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर; राशिद खानची मोठी झेप, सूर्यकुमारचं अव्वल स्थान कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---