भारतीय महिला पंच वृंदा राठी यांनी इतिहास रचला आहे. त्या द्विपक्षीय मालिकेत तटस्थ ठिकाणी पंच म्हणून काम पाहणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. बांग्लादेशच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि बांग्लादेश महिला संघ यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात आहे. वृंदा राठी या सामन्यात अंपायरिंग करत आहेत. आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला पंचानं द्विपक्षीय मालिकेत तटस्थ ठिकाणी अंपायरिंग केलं नव्हतं. आता वृंदा राठी असं करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पंच बनल्या आहेत.
नुकताच भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात मुंबईत कसोटी सामना खेळला गेला. वृंदा राठी यांनी त्या कसोटीत पंच म्हणून पदार्पण केलं. अशाप्रकारे त्या भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच बनल्या. याशिवाय वृंदा राठी यांनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही पंचाची भूमिकाही बजावली होती.
वृंदा राठी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या मुंबईच्या रहिवासी आहेत. त्या 2014 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. जवळपास 4 वर्षांनंतर, 2018 मध्ये, त्या बीसीसीआयच्या पंचांच्या परीक्षेत यशस्वी झाल्या. वृंदा राठी यांचा 2020 मध्ये पंचांच्या ICC विकास पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून त्या सतत अंपायरिंग करत आहे.
वृंदा राठी यांनी आतापर्यंत 13 महिला एकदिवसीय आणि 43 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केलं आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतही वृंदा राठी यांनी पंचाची भूमिका पार पाडली होती. याशिवाय वृंदा राठी यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर आयोजित महिला प्रीमियर लीग स्पर्धेतही अंपायरिंग केलं आहे.
10 जानेवारी 2023 रोजी वृंदा राठी आणि नारायण जननी यांनी पुरुषांच्या देशांतर्गत सामन्यात ऑन-फिल्ड अंपायरिंग केलं होतं. ही कामगिरी करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला पंच बनल्या होत्या. याशिवाय या जोडीनं 2022-23 रणजी ट्रॉफीमध्ये गोवा आणि पुदुच्चेरी यांच्या सामन्यातही अंपायरिंग केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूची अयोध्येतील राम मंदिरात पूजा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
IPL 2024 मध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? काय असेल त्याची संघातील भूमिका?
मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ गोलंदाज आयपीएलमध्ये खेळणार, मुंबई इंडियन्समध्ये 17 वर्षीय खेळाडूची एंट्री