अहमदनगर :- आज दिनांक २१ ते २४ मार्च या चार दिवसात नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलात “७०व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डीचा थरार रंगेल. गतउपविजेत्या महाराष्ट्राच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हाक्रीडा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते गुरुवार दिनांक २१मार्च सायं. ५-०० वाजता या स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची ८ गटात विभागणी करण्यात येणार असून महाराष्ट्राचा ब गटात समावेश असेल. प्रत्येक गटातून २ संघ असे एकूण १६ संघ बाद फेरी गाठतील. बाद फेरीच्या सामन्यापासून खऱ्या अर्थाने स्पर्धेत चुरस पहावयास मिळेल.
स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मॅटच्या ४ क्रीडांगणावर एकाच वेळी सामने पहावयास मिळतील. सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. तीस हजार क्रीडारसिकांना स्पर्धेचा आनंद मनमुराद लुटता यावा याकरिता प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. बुधवार पर्यंत २२ संघाचे आगमन नगर मध्ये झाले असून ८ संघ येण्याच्या मार्गावर आहेत. स्पर्धेतील सामने वेळेवर सुरू करून वेळेत संपविण्याचा आयोजकांचा मानस आहे. स्पर्धा आयोजक जिल्हा सचिव शशिकांत गाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह क्रीडांगणाची पाहाणी केली.
महत्वाच्या बातम्या –
एएनपी कॉर्पच्या वतीने ‘एएनपी रन पुणे रन’ धर्मादाय अर्ध मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन
सूर्यकुमार यादव पहिला सामना खेळला नाही तर कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11? जाणून घ्या