---Advertisement---

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास, इतक्या धावा करताच बसणार मानाच्या पंगतीत

Virat Kohli
---Advertisement---

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला  22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच आयपीएल 2024 स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्याने होणार आहे. तर या सामन्यापासून स्पर्धेचा रंग चढत जाणार आहे. तसेच या सामन्यात धोनी आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू आमनेसामने येणार आहेत. याबरोबरच, विराट कोहली या सामन्यात इतिहास रचू शकतो.

अशातच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा आणि शतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तसेच एका सीझनमध्ये सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. तसेच 2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या. मात्र विराट कोहली आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात  6 धावा करताच अजुन एक विक्रम त्याच्या नावावर होणार आहे.

याबरोबरच चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात  6 धावा करताच विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. तसेच विराट कोहलीने टी20 फॉर्मेटमध्ये 11994 धावा केल्या आहेत. तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4037 आणि आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या आहेत.

या पंगतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने टी20 फॉर्मेटमधये 11156 धावा केल्या आहेत. 9465 धावांसह शिखर धवन तिसऱ्या, 8654 धावांसह सुरेश रैना चौथ्या आणि 7066 धावांसह केएल राहुल पाचव्या स्थानी आहे. तसेच अलीकडेच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट कोहली खूप दिवसा नंतर मैदानात उतरणार आहे.

T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू 

विराट कोहली : 11994 धावा
रोहित शर्मा : 11156 धावा
शिखर धवन : 9645 धावा
सुरेश रैना : 8654 धावा
रॉबिन उथप्पा : 7272 धावा

T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ख्रिस गेल: 14562 धावा
शोएब मलिक: 13360 धावा
केरॉन पोलार्ड: 12900 धावा
ॲलेक्स हेल्स: 12319 धावा
डेव्हिड वॉर्नर: 12065 धावा
विराट कोहली: 11994 धावा

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---