---Advertisement---

‘जखमेवर मीठ’ लाजिरवाण्या पराभवानंतर आयसीसीनं पाकिस्तानला सुनावली मोठी शिक्षा

On: सोमवार, ऑगस्ट 26, 2024 8:13 PM
---Advertisement---

पाकिस्तान दौऱ्यावर बांगलादेशनं पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानच्या या पराभवानंतर संघाला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीनं (ICC) पाकिस्तानला दंड ठोठावला आहे. स्लो-ओव्हर रेटमुळे पाकिस्तानला 30 टक्के सामना फी दंड ठोठावण्यात आला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतही पाकिस्तानला मोठा झटका बसला.

बांगलादेश आणि पाकिस्तान (Bangladesh vs Pakistan) कसोटी मालिकेचा पहिला सामना रावलपिंडीमध्ये खेळला गेला. बांगलादेशनं हा सामना 10 विकेट्सनं जिंकला. परंतु या सामन्यादरम्यान, पाकिस्ताननं नियोजित वेळेत 6 षटकं कमी केली. या कारणास्तव, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतूनही त्यांचे 6 गुण कमी झाले आहेत.

पाकिस्तानला सामन्यादरम्यान 30 टक्के सामना फी दंड ठोठावण्यात आला, तर बांगलादेशला 1 टक्के सामना फी दंड देण्यात आला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि बांगलादेश यांनी कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी ही चूक स्वीकारली. आयसीसीनं आपल्या वेबसाइटवर याबद्दल माहिती दिली आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2 सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत बांगलादेशनं 1-0 ने आघाडी घेतली. बांगलादेशनं कसोटीमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला पराभूत केलं आणि इतिहास रचला. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना (30 ऑगस्ट) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना रावलपिंडी मैदानावर रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्जची खास रणनिती! संजय बांगर यांचा खुलासा
‘या’ संघाची ऐतिहासिक कामगिरी, बनला T20I मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार रोहितने कसली कंबर, सुरू केली खास ट्रेनिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---