इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना शुक्रवार, 22 मार्चपासून खेळला जाईल. मात्र, त्याआधी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी आहे. रिपोर्टनुसार, टीमचा मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळख असलेला सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. अशा परिस्थितीत सूर्याशिवाय मुंबईची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे जाणून घेऊया.
जर सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात खेळला नाही तर कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. हार्दिक गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्ससाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. तो हा गुजरातच्या फलंदाजीचा मुख्य दुवा होता. जर सूर्या उपलब्ध नसेल तर मुंबईसाठीही पांड्या त्याच भूमिकेत दिसू शकतो.
जर सूर्यकुमार यादव खेळला नाही तर नेहाल वढेरा आणि विष्णू विनोद या दोघांपैकी एकाचा अंतिम अकरामध्ये समावेश होऊ शकतो. मात्र, वढेराच्या खेळण्याच्या अपेक्षा जास्त आहेत, कारण तो खालच्या फळीत स्फोटक फलंदाजीसोबतच गरजेच्या वेळी गोलंदाजीही करू शकतो.
मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन डावाची सुरुवात करतील. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत टॉप ऑर्डरमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. कर्णधार हार्दिक पाड्या चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर नेहाल वढेरा पाचव्या क्रमांकावर तर टीम डेव्हिड सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरेल. अफगाणिस्तानचा सुपरस्टार मोहम्मद नबी सातव्या क्रमांकावर खेळू शकतो.
प्लेईंग इलेव्हनमध्ये नबीची उपस्थिती टीमला संतुलन देईल. त्याच्या येण्यानं फिरकी गोलंदाजीही अधिक मजबूत होईल. डेव्हिड आणि नबी मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतात. अनुभवी पीयूष चावला हा संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज असेल. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराहसोबत रोमॅरिओ शेफर्ड आणि जेराल्ड कोएत्झी संघाची धुरा सांभाळतील.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, रोमॅरिओ शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
CSK vs RCB सामन्याची तिकिटं कशी खरेदी करायची? तिकिटांची किंमत किती? जाणून घ्या सर्वकाही
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबईचा राजा संघात दाखल, पाहा व्हिडिओ
IPL सोडा, PSL ची बक्षीस रक्कम तर WPL पेक्षाही कमी! जाणून घ्या चॅम्पियन इस्लामाबादला किती पैसै मिळाले