---Advertisement---

रत्नागिरी संघावर मात देत पालघर संघाचा प्रमोशन फेरीत दुसरा विजय

---Advertisement---

पुणे (20 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना पालघर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झाला. प्रमोशन फेरीतील पहिला सामना रत्नागिरी संघ पराभूत झाला होता तर पालघर संघाने पहिला सामना जिंकला होता. दोन्ही संघानी सावध सुरुवात केली होती. पहिल्या 9 मिनिटाच्या खेळांतर सामना 7-7 असा बरोबरीत होता. त्यानंतर मात्र पालघरच्या यश निंबाळकर व प्रतिक जाधव यांच्या आक्रमक खेळीने पालघर संघाने आघाडी मिळवली.

मध्यंतरापूर्वी पालघरच्या प्रतिक जाधव ने 5 गुणांची सुपर रेड करत रत्नागिरी संघाला ऑल आऊट केले. प्रतिक जाधव ने सुपर टेन पूर्ण करत मध्यांतराला पालघर संघाने 24-12 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. प्रतिक जाधव ने मध्यंतरा नंतरही जोरदार खेळ करत संघाची आघाडी वाढवली. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे व श्रेयस शिंदे यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

पालघर संघाने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व राखत सामना 47-30 असा जिंकला. पालघर कडून प्रतिक जाधव ने चढाईत 20 गुण मिळवले. तर यश निंबाळकर ने 7 गुण मिळवले. पालघरच्या योगेश मोरसे व हर्ष मेहेर यांनी पकडीत प्रत्येकी 2 गुण मिळवले. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे ने चढाईत 14 गुण मिळवले. निलेश शिंदे ने पकडीत 3 गुण मिळवले. (Beating Ratnagiri team, Palghar team’s second win in the promotion round)

बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- निलेश शिंदे, रत्नागिरी
कबड्डी का कमाल – प्रतिक जाधव, पालघर

महत्वाच्या बातम्या – 
प्रमोशन फेरीत अहमदनगर, कोल्हापूर, पालघर व सांगली संघांची विजयी सुरुवात
CSK vs RCB सामन्याची तिकिटं कशी खरेदी करायची? तिकिटांची किंमत किती? जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---