---Advertisement---

ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं पदक खेळाडू दातांनी का चावतात? हा नियम आहे की परंपरा? जाणून घ्या

---Advertisement---

26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. हे खेळ 11 ऑगस्टपर्यंत चालतील. यावेळी भारताचे 117 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्यापैकी अनेकांकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. मात्र आज आपण एका वेगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत.

ऑलिम्पिक असो, कॉमनवेल्थ असो किंवा आशियाई खेळ, चाहत्यांनी अनेकदा खेळाडूला त्याचं जिंकलेलं पदक दातानं चावताना पाहिलं आहे. आता प्रश्न असा आहे की, जेव्हा एखादा खेळाडू कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पदक जिंकतो तेव्हा तो आपलं पदक दातानं का चावतो? हा नियम आहे की परंपरा? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. चला तर मग, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

प्राचीन काळी मौल्यवान धातू चलन म्हणून वापरला जात असे. त्यावेळी सोन्याची नाणी शुद्धता तपासण्यासाठी चावली जात असत, कारण सोनं हा मऊ धातू आहे आणि तो थोडा जरी दाब दिला तरी वाकतो. दातानं चावल्यास त्याचे ठसे उमटतात. परंतु पदक दातानं चावणे म्हणजे त्याची शुद्धता तपासणे असा अर्थ होत नाही.

1912 पूर्वी शुद्ध सोन्याची पदकं दिली जात होती. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (IOC) शुद्ध सुवर्ण पदकं देणं बंद केलं. असंही म्हटलं जातं की, 1912 पूर्वीही खेळाडू दातांनी पदक चावत असत. परंतु तेव्हा ते सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी करायचे. मात्र ही परंपरा 1912 नंतरही कायम आहे. आता यामागे एक वेगळी धारणा आहे.

असं म्हटलं जातं की, जिंकलेलं पदक चावल्यानं खेळाडू त्याची मेहनत आणि स्पर्धेतील त्याचा उत्साह दाखवतो. ऑलिम्पिकच्या साईटवर खेळाडू पदकांचा चावा का घेतात याबाबत सांगितलं आहे. ऑलिम्पिकनुसार, खेळाडू केवळ फोटो काढण्यासाठी पदकांना दातांनी चावतात. जेव्हा खेळाडू व्यासपीठावर पदक धरून उभे असतात, तेव्हा छायाचित्रकार त्यांना दातांनी पदक चावल्यासारखी पोझ देण्यास सांगतात. पदकाला दातानं चावण्याची पोझ ही केवळ खेळाडूसाठीच नाही तर छायाचित्रकारासाठीही परंपरा बनली आहे.

याबाबतची एक मजेशीर घटना म्हणजे, ही पोज देताना एका ॲथलीटचा दात तुटला होता. ही घटना 2010 च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये घडली, जेव्हा जर्मनीच्या लुगर डेव्हिड मोलरनं रौप्य पदक जिंकलं. यानंतर एका छायाचित्रकारानं मोलरला दातांनी पदक चावत असताना पोझ देण्यास सांगितलं. यावेळी त्याचा एक दात तुटला. मोलरनं स्वतः ‘बिल्ड’ या जर्मन वृत्तपत्राला ही माहिती दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, स्टार खेळाडूचं दोन वर्षांनंतर पुनरागमन
टी20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवणारा यूएसए संघ होऊ शकतो बॅन! आयसीसीच्या निर्णयानंतर टांगती तलवार
फक्त मैदानावरच नाही, तर बिझनेसमध्येही ‘किंग’ बनणार कोहली, हा आहे मास्टर प्लॅन!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---