भारतीय क्रिकेट संघात असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांची कारकीर्द केवळ काही सामने खेळल्यानंतर संपुष्टात आली. चला तर मग या बातमाीद्वारे, आम्ही अशा एका गोलंदाजाविषयी सांगत आहोत, ज्याने पदार्पण करताच जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली होती, मात्र निवडकर्त्यांनी त्याला दुधातल्या माशीप्रमाणे टीम इंडियातून बाहेर केले. या गोलंदाजाने भारताचा वरिष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराहसारखा धोकादायक यॉर्कर टाकून जगभरात नाव कमावले होते, मात्र आता निवड समिती त्याला कोणत्याही छोट्या संघाविरुद्धच्या मालिकेतही संधी देत नाहीये.
भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करताच खळबळ उडवून दिली. त्याने आपल्या अचूक लाईन-लेन्थ आणि घातक यॉर्कर्सने फलंदाजांना चितपट केले होते. त्याचा यॉर्कर पाहून अनेक दिग्गजांनी त्याची तुलना श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्याशी केली होती, पण 2020 मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनला 2021 पासून कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी मिळालेली नाही.
टी. नटराजन भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. 1 कसोटी सामना, 4 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 3 विकेट, 7 विकेट आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2020 मध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टी. नटराजनला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. नटराजनने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. विशेषत: त्याने डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्यात त्याची शैली खूप चांगली होती. त्याच्या गोलंदाजीतही बरेच वैविध्य आहे.
33 वर्षीय वेगवान गोलंदाज टी. नटराजनने 28 मार्च 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्थान मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, तो आयपीएलमध्ये सतत खेळत आहे. 2024 च्या आयपीएल हंगामात तो सनरायझर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL: अशी असणार पहिल्या टी20 साठी टीम इंडियाची प्लेइंग-11? सूर्या-गंभीरच्या जोडीवर राहणार नजरा
टीम इंडियाचे 5 ‘अमीरजादे’, फक्त लक्झरी कार आणि बाईकच नाही तर प्रायव्हेट जेटचे देखील आहेत मालक
सचिन तेंडूलकरही जो रुटपुढे काहीच नाही…! इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य






