Richest Indian Cricketers :- क्रीडा जगतात असे अनेक खेळाडू आहेत, जे आपल्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. या यादीत भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांबरोबरच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलद्वारे भरपूर पैसा कमावतात. त्यामुळे बहुतांश भारतीय क्रिकेटपटूंकडे आलिशान कार आणि बाइक्सचे कलेक्शन आहे. पण टीम इंडियामध्ये असेही काही श्रीमंत क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट देखील आहे. भारतीय संघाचा दिग्गज विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनीसारखी मोठी नावे या यादीत आहेत.
स्वत:च्या मालकीचे जेट असलेले भारतीय क्रिकेटपटू –
विराट कोहली- जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश होतो. विराटची एकूण संपत्ती 1100 कोटी रुपये आहे. कोहली केवळ क्रिकेटमधूनच नाही तर ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियातूनही भरपूर कमाई करतो. विराटकडे स्वतःचे एक लक्झरी जेट देखील आहे.
कपिल देव- प्रायव्हेट जेट असणाऱ्या भारती क्रिकेटपटूंच्या यादीत माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या नावाचाही समावेश आहे. आपल्या काळातील महान अष्टपैलू कपिल देव यांच्याकडेही एक आलिशान जेट आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 साली पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता.
हार्दिक पांड्या- भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याचाकडे करोडोंच्या आलिशान गाड्यांचा संग्रह तुम्हाला पाहायला मिळेल. यासोबतच त्याच्याकडे एक प्रायव्हेट जेट देखील आहे, ज्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये खूप महागडे वर्णन करण्यात आले आहे.
एमएस धोनी- टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच कार आणि बाइक्सची आवड आहे. त्याचे घर शोरूमपेक्षा कमी नाही. पण धोनीकडे फक्त कार आणि बाईकच नाही तर एक प्रायव्हेट जेटही आहे.
सचिन तेंडुलकर- या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचाही समावेश आहे. सचिन तेंडुलकर हा जगातील महान क्रिकेटपटू तर आहेच पण श्रीमंत खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश आहे. सचिनची एकूण संपत्ती 1250 कोटी रुपये आहे. त्याचे स्वतःचे खाजगी जेट देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
करोडोंची संपत्ती, एकापेक्षा एक महागड्या गाड्या, ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा जगतोय असे आलिशान आयुष्य
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार 16 संघ, आयसीसीनं दिली मंजुरी
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!