---Advertisement---

IND vs AFG: संजू- अभिषेकची दमदार खेळी! दुसऱ्या टी-20 मध्ये 7 विकेट्सने विजय मिळवत मालिका टीम इंडियाच्या नावावर

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2026 10:46 PM
---Advertisement---

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा 7 (India vs Afghanistan 2nd T20 match) विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 15 व्या षटकात हे लक्ष्य गाठले.

भारताकडून संजू सॅमसनने (Sanju Samson) 22 चेंडूंत 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने 7 चौकार आणि 4 षटकार ठोकले, तर अभिषेक शर्माने 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 19 चेंडूंत 39 धावा केल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली आहे.

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 82 धावा केल्या. भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी अफगाणिस्तानने दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांकडून गोलंदाजीला सुरुवात केली. मात्र, सॅमसन आणि अभिषेकसमोर त्यांचा एकही डाव यशस्वी झाला नाही. या दोघांनी पॉवरप्लेमध्येच टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित केला होता. भारताने 14.5 षटकांत 3 विकेट्स गमावून 160 धावांचे लक्ष्य गाठले.

या विजयासह टीम इंडियाने मालिका आपल्या नावावर केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---