---Advertisement---

रोहित राहिला मागे! बटलर पोहोचला बाबर आझमच्या विश्वविक्रमाजवळ, टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक…

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2026 11:14 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळली जात आहे. याची सुरूवात टी20 मालिकेने झाली असून पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी कहर केला. कर्णधार हॅरी ब्रूकने झंझावाती शतक केले तर, सलामीवीर-विकेटकीपर जोस बटलरने धमाकेदार अर्धशतकी खेळी करत रोहित शर्माचा विश्वविक्रम मागे टाकला.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (15 सप्टेंबर) साउथहॅम्प्टन येथे खेळला गेला. या सामन्यात ब्रूक आणि बटलरच्या दुसऱ्या विकेटसाठीच्या 128 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 20 षटकांत 4 विकेट्स गमावत 254 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 19 षटकांत 135 धावसंख्येवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना इंग्लंडने 119 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात बटलरने 44 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 80 धावा केल्या. याबरोबर तो टी20 आतंरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. भारताचा माजी कर्णधार रोहितने जून 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली. तोपर्यंत त्याने या फॉरमॅटच्या 159 सामन्यांमध्ये 4231 धावा केल्या. बटलर त्याच्या पुढे गेला असून त्याने 161 सामन्यांमध्ये 4292 धावा केल्या.

टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतक रोहिच्याच नावावर आहे. त्याने पाच तर बटलरने दोन शतके केली आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 145 सामन्यांमध्ये 4596 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत भारताचा महान फलंदाज विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. त्याने 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4188 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 38 अर्धशतके केली आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी येण्यासाठी बटलरला केवळ 305 धावांची आवश्यकता आहे. त्याने पुढील सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म असाच कायम राखला, तर तो लवकरच पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकण्याची शक्यता आहे.

पुरुष टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा
1) 4596 – बाबर आझम (136 डाव)
2) 4292 – जोस बटलर (148 डाव)
3) 4231 – रोहित शर्मा (151 डाव)
4) 4188 – विराट कोहली (117 डाव)

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना 17 सप्टेंबरला कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. (Jos Buttler went past Rohit Sharma in more runs in men’s T20Is ENGvsSL 1st T20I)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---