---Advertisement---

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्टइंडीजचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

On: रविवार, सप्टेंबर 20, 2026 7:28 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 एकदिवसीय (ODI) आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर करण्यात आला असून, यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज शाई होप दोन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व करेल. याव्यतिरिक्त, संघात रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, कीमो पॉल आणि शेरफेन रदरफोर्ड यांचा समावेश आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यानंतर, वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी एकदिवसीय संघाबाबत आपली मते मांडली. ते म्हणाले, “जगातील अव्वल संघांपैकी एका संघाविरुद्ध खेळल्याने आम्हाला एकदिवसीय संघ म्हणून आमची कामगिरी सुधारण्याची संधी मिळते. भारतीय संघाने या संपूर्ण चक्रात चांगली कामगिरी केली आहे. 2027 च्या विश्वचषकात स्पर्धा करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टासह खेळाडूंचे मूल्यमापन करण्यासाठी ही मालिका एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल.”

वेस्ट इंडिजने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. टी-20 संघाबद्दल बोलताना डॅरेन सॅमी म्हणाले, “श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयातून मिळालेला आत्मविश्वास आम्हाला पुढे न्यायचा आहे. पुढील टी-20 विश्वचषकापूर्वी एक मजबूत संघ तयार करणे हे आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. विश्वविजेत्या भारताच्या घरच्या मैदानावर खेळण्याचे आव्हान आम्हाला महत्त्वपूर्ण तयारीसाठी मदत करेल. या माध्यमातून आम्ही वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही स्तरांवर सुधारणा करत राहू.”

वनडे मालिकेसाठी संघ- शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्ज, आमिर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स.

टी20 मालिकेसाठी संघ- शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकील होसेन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोवमॅन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमारियो शेफर्ड, शमर स्प्रिंगर.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दाैऱ्याचे वेळापत्रक-

पहिली वनडे: 27 सप्टेंबर – तिरुवनंतपुरम, दुपारी 2 वाजता
दुसरी वनडे: 30 सप्टेंबर – गुवाहाटी, दुपारी 2 वाजता
तिसरी वनडे: 3 ऑक्टोबर – न्यू चंदीगड, दुपारी 2 वाजता

पहिली टी-20: 6 ऑक्टोबर – लखनऊ, संध्याकाळी 7 वाजता
दुसरी टी-20: 9 ऑक्टोबर – रांची, संध्याकाळी 7 वाजता
तिसरी टी-20: 11 ऑक्टोबर – इंदूर, संध्याकाळी 7 वाजता
चौथी टी-20: 14 ऑक्टोबर – हैदराबाद, संध्याकाळी 7 वाजता
पाचवी टी-20: 17 ऑक्टोबर – बेंगळुरू, संध्याकाळी 7 वाजता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---