क्रिकेटटॉप बातम्याभारताचा श्रीलंका दौरा

मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याने कुणाला मारली घट्ट मिठी? व्हिडिओ तुफान व्हायरल

India Tour Of Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत संघ निवडीसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. यानंतर प्रशिक्षक आणि त्यांचा नवा कोचिंग स्टाफ भारतीय संघासह श्रीलंकेला रवाना झाला. श्रीलंकेला जाण्यापूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या हा एका विशिष्ट व्यक्तीला मिठी मारताना दिसला.

मुंबई येथून श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी गंभीर व आगरकर यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत, अनेक चर्चांना पूर्णविराम दिला. यानंतर गंभीर व सर्व खेळाडू विमानतळावर निघाले. खेळाडूंच्या या पहिल्या गटात केवळ टी20 मालिकेसाठी निवड झालेले खेळाडू पोहोचले आहेत. मुख्य प्रशिक्षक गंभीरसोबत संजू सॅमसन व रवी विष्णू हे दिसून आले.

अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील यावेळेस संघासोबत श्रीलंकेला जाण्यासाठी रवाना झाला. त्यावेळी त्याने नव्याने संघाचा सहाय्यक प्रशिक्षक बनलेल्या अभिषेक नायर याच्याशी बोलणे केले. तसेच, पुढे जाण्यापूर्वी त्याला मिठी देखील मारली. या दौऱ्यासाठी संघाची निवड होण्यापूर्वी, हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, अखेर कर्णधारपदाची माळ सूर्यकुमार यादव याच्या गळ्यात पडली.

भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेची सुरुवात 27 आणि 28 जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी आणि दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्यानंतर शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या-

आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!
आश्चर्यकारक! षटकार मारल्यानंतर खेळाडूला केलं बॅन, क्रिकेटमध्ये हा कुठला आगळा-वेगळा नियम
मितांश, यशश्रीची हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर संघांच्या कर्णधारपदी निवड

Related Articles